चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:42 IST2025-12-27T11:40:53+5:302025-12-27T11:42:21+5:30
१८ वर्षाच्या तरुणीने तिच्याच चुलत भावासोबत शरीरसंबंध ठेवले. चूक झाली आणि गर्भवती राहिली. त्यानंतर चुलत भावाने गर्भपातासाठी गोळी दिली आणि तेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले.

चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी आणि तिच्या चुलत भावाने शरीरसंबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. दोघेही यामुळे हादरले. त्यानंतर तरुणाने तरुणीला गर्भपात करण्यासाठी गोळी दिली. त्याच गोळीमुळे तिची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ही घटना घडली असून, १८ वर्षीय तरुणीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
तरुणीला बळजबरी गोळी दिली
मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणावर आरोप केले आहेत. तरुणीला बळजबरी गर्भपाताची गोळी खाऊ घालण्यात आली. त्यामुळेच तिची तब्येत बिघडत गेली, असा आरोप तरुणीच्या आईवडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तरुणीचे तिच्या चुलत भावासोबत शरीरसंबंध होते. त्यातूनच ती गर्भवती राहिली. चुलत भावाने ती गर्भवती असल्याची बाब लपवण्यासाठी त्याने गोळी खाऊ घातली.
१८ डिसेंबर रोजी रुग्णालयात केलं दाखल
तरुणीची अचानक प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला नोएडातील एका रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. प्रकृती गंभीर असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला सफदरजंग रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे काही दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. २३ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
चुलत भावाला अटक
तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी सेक्टर ३९ मधील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर चुलत भावाला अटक करण्यात आली. शवविच्छेदन रिपोर्टनुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.