देवीच्या मंडपात लायटिंग लावण्याच्या वादातून तरुणास चाकूने भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 05:29 PM2021-10-09T17:29:51+5:302021-10-09T18:29:12+5:30

Stabbing Case : पहाटे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाचा नातेवाईकांना ताबा दिला. तणावपूर्ण वातावरणात सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

The young men were stabbed in a dispute over lighting in the Pandal | देवीच्या मंडपात लायटिंग लावण्याच्या वादातून तरुणास चाकूने भोसकले

देवीच्या मंडपात लायटिंग लावण्याच्या वादातून तरुणास चाकूने भोसकले

Next
ठळक मुद्दे संशयित हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय 25 रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.   वैभव साताप्पा भोपळे (वय 25 रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  नवरात्र काळात ही घटना घडल्याने खेबवडे परिसरात तणावाची निर्माण झाला आहे.

कोल्हापूर :  नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतानाच मंडपात लाइटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना  खेबवडे ( ता. करवीर) येथे शनिवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय 25 रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय 25 रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.

                             
नवरात्र काळात ही घटना घडल्याने खेबवडे परिसरात तणावाची निर्माण झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव जिल्हा विशेष पथकाचे तानाजी सावंत इस्पुरलीचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मध्यरात्रीच खेबवडे येथे दाखल झाला.                          

पोलिसांची जादा कुमक मागविल्याने शनिवारी दुपारनंतर वातावरण निवळला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेबवडे गावात शिवाजी चौकात शिवशंभु तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मध्यवर्ती चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी चौकालगत मंगल कार्यालयात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर मंडळाचे सर्व कार्यकर्ते चौकात थांबले होते. यावेळी सुरज पाटील तेथे आला, यंदा नवरात्र उत्सवासाठी माझी लाइटिंग का घेतली नाही असा त्याने जाब विचारत  कार्यकर्त्यांशी वादावादी सुरू केली. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने नवरात्र महोत्सव होत असल्याने पुढील वर्षी पाहू असे  कार्यकर्त्यांनी संशयिताला सांगितले. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

               
नवरात्र उत्सव सोहळ्यासाठी पुढाकार घेणारा वैभव भोपळे याच्याशी संशयिताने हुज्जत घातली, दोघात शाब्दिक वादावादी झाल्यानंतर संशयित वैभव भोपळे यांच्या अंगावर धावून गेला. धारदार चाकूने पोटावर वर्मी वार केल्याने वैभव जमिनीवर कोसळला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले तरुणाचा खून झाल्याचे समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. 


पहाटे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाचा नातेवाईकांना ताबा दिला. तणावपूर्ण वातावरणात सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित सुरज पाटील  पोलिसांना शरण आला. खबरदारीचा उपाय म्हणून खेबवडे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: The young men were stabbed in a dispute over lighting in the Pandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.