१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:51 IST2025-08-12T17:49:50+5:302025-08-12T17:51:07+5:30
UP Crime News: मॉडेल कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभी होती, त्यावेळी घडला धक्कादायक प्रकार

१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
Uttar Pradesh Crime News: सार्वजनिक ठिकाणी भररस्त्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास गुरुग्राममधील अतिशय वर्दळीच्या राजीव चौकात विचित्र घटना घडली. जयपूरहून गुरुग्रामला परतणारी एक मॉडेल कॅबची वाट पाहत होती. यादरम्यान, मास्क घातलेल्या एका व्यक्तीने मॉडेलसमोर येऊन त्याच्या पँटची चेन उघडली आणि हस्तमैथुन करू लागला. मुलीने आरोपीचे अश्लील कृत्य पुराव्यासाठी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. त्यानंतर पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या.
पोलिसांत तक्रार
सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे एसएचओ कृष्णा म्हणाले की आम्हाला तक्रार मिळताच एफआयआर नोंदवण्यात आला. मॉडेलने पोलिस स्टेशनमध्ये येऊन तिचा जबाब नोंदवला होता. आरोपी तरुणाला अटक करण्यासाठी आम्ही विविध गोष्टींचा शोध घेतला. आरोपी मास्क लावून रस्त्यावर आला होता. त्यामुळे आपली ओळख पटणार नाही या आविर्भावात त्याने घाणेरडे कृत्य केले. पण पोलिसांना त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.
आरोपी विवाहित, १४ लाखांचे पॅकेज
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे नाव अभिषेक असून तो विवाहित आहे. त्याला एक मुलगादेखील आहे. तो गुरुग्रामच्या सेक्टर-११ मध्ये एक वर्षापासून राहत होता. हा हरयाणातील करनाल येथील रहिवासी आहे. घटनास्थळाभोवती लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. आरोपी तरुण हा एम टेक पदवीधर आहे. तो गुरुग्राममधील एका खाजगी कंपनीत १४ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर काम करतो.
आधीही छेड काढल्याप्रकरणी चर्चेत
पोलिसांनी सांगितले की, गुन्हा केल्यानंतर अभिषेक त्याच्या खोलीत आला. त्यानंतर तो दररोज त्याच्या कामावरही जाऊ लागला. त्याला वाटले की त्याने मास्क घालून गुन्हा केला आहे, त्यामुळे कोणीही त्याला ओळखू शकणार नाही आणि तो पकडला जाणार नाही. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला पकडले. त्याच्या अटकेनंतर, खुलासा झाला की, आरोपीने यापूर्वीही जेएमडी इमारतीत काम करणाऱ्या एका तरुणीची छेड काढली होती.
दरम्यान, मॉडेलने घटनेची माहिती देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर पोलिस हेल्पलाइनवर फोन केला गेला. ऑनलाइन तक्रारीवरून कारवाई करण्यास सुरुवात झाली. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.