खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करून रेल्वे स्टेशनजवळ तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 18:47 IST2021-12-20T18:45:34+5:302021-12-20T18:47:27+5:30
Murder Case : उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा परिसर अंमली पदार्थाची विक्री, चोरी, बलात्कार, खून, हाणामारी यासाठी प्रसिद्ध झाला असून नागरिक रात्रीचे १० नंतर या परिसरात जाण्यास घाबत आहेत.

खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करून रेल्वे स्टेशनजवळ तरुणाची हत्या
सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगररेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला आनंद शेट्टी नावाच्या तरुणाचा रविवारी रात्री साडे बारा व एक वाजण्याच्या दरम्यान धारदार शस्त्राने खून झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघाना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा परिसर अंमली पदार्थाची विक्री, चोरी, बलात्कार, खून, हाणामारी यासाठी प्रसिद्ध झाला असून नागरिक रात्रीचे १० नंतर या परिसरात जाण्यास घाबत आहेत. रविवारी रात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आनंद श्रीहरी शेट्टी या तरुणाची धारदार शस्त्रांनी एका टोळक्याने खून केल्याने, परिसरात खळबळ उडाली. मध्यवर्ती पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तपास पथकाने दोघांना काही तासात ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी रवी गांजने व जब्बार फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्या मार्गावर तपास पथक असून दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सन २०१८ मध्ये दोघांनाही तडीपार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिले. आनंद शेट्टी यांनी हत्या कौटुंबिक वादातून झाली असावी. अशी शंका यावेळी पोलीस उपायुक्त मोहिते यांनी व्यक्त केले.