लातुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:34 IST2020-09-26T00:34:38+5:302020-09-26T00:34:45+5:30

गुन्हा दाखल : खाडगाव रोड परिसरातील घटना

Young man stabbed to death in Latur | लातुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

लातुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

लातूर : एका 25 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना खाडगाव रोड परिसरातील दयानंद गेट येथे गुरुवारी रात्री उशिरा घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी सांगितले, बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगचे काम करणाऱ्या महेबूब आलम पठाण (25 रा. सदाशिव नगर, खाडगाव रोड, लातूर) या तरुणाला चाकुने भोसकण्यात आले. सदरची घटना, गुरुवारी रात्री 9 ते 10 च्या सुमारास घडली. जखमी झालेला महेबूब हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन फरार झाले. जखमी झालेल्या तरुणाला नातेवाईकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरु असताना महेबूबचा शुक्रवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास म्रुत्यू झाला. महेबूब याच्यावर मारेकऱ्यांनी का हल्ला केला, हे कारण शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. खूनाच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत, असे पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी सांगितले.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आलम महेताब पठाण (60) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरोधात शुक्रवारी रात्री सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young man stabbed to death in Latur

टॅग्स :Murderखून