शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा 'तो' व्हिडीओ पाहून पतीने स्वतःला संपवलं; महाराष्ट्रातल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून देत होती त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:54 IST

हरियाणामध्ये एका तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले

Rohtak Magan Death: हरियाणाच्या रोहतकमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रोहतकमध्ये एका पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मृत पतीने एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये त्याने पत्नी आणि तिचा प्रियकर मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली होती. पत्नीने तिच्या प्रियकरासोबतचा अश्लील डान्सचा व्हिडिओ पतीला पाठवल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचललं. या घटनेनंतर मृताचे कुटुंबिय आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. मुलाच्या वेदनादायक मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे आणि ते अस्वस्थ झाले आहेत.

रोहतकमधील दोभ गावातील रहिवासी मगनने गेल्या आठवड्यात पत्नी आणि प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पत्नी दिव्या आणि तिच्या पोलिस निरीक्षक प्रियकराला कंटाळून पती मगन उर्फ ​​अजयने आत्महत्या केली होती. दिव्याच्या ज्या व्हिडीओमुळे मगनने आयुष्य संपवलं तो आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये दिव्या नाचत आहे आणि पोलीस असलेला प्रियकर तिचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओत असलेली व्यक्ती महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी असल्याचे समोर आलं. महाराष्ट्रातील इगतपुरी येथून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिव्या तिच्या प्रियकर दीपकसोबत दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करताना, दोघेही अश्लील कृत्ये करताना दिसतात.

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ दिव्याने तिच्या मगनला पाठवला होता. त्यानंतर, त्याने नैराश्यात येऊन ३ दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी मगनने एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये त्याने सांगितले की, दिव्या मला माझ्या वडिलांना मारण्यासाठी आणि वडिलोपार्जित जमीन विकण्यास सांगत होती कारण तिच्या पोलिस बॉयफ्रेंडला बढतीसाठी पैशांची आवश्यकता होती. १८ जून रोजी रात्री उशिरा रोहतकमधील दोभ येथे मगनचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. आत्महत्या करण्यापूर्वी मगनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो आत्महत्या करण्याबद्दल बोलले होता.  कुटुंबातील सदस्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि मगनचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांना मगनचा मृतदेह सापडला. कुटुंबियांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. 

मगन व्हिडिओमध्ये काय म्हणाला?

"माझी पत्नी दिव्याचे दीपकशी प्रेमसंबंध आहेत. तो पोलीस आहे आणि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. ते दोघेही मिळून मला मानसिक त्रास देत आहेत. दोघे मिळून मला माझ्या वडिलांना मारून जमीन विकण्यास सांगत होते. ते म्हणत होते की मी माझी वडिलोपार्जित जमीन विकावी. त्या पैशातून आपण मुंबईत एक फ्लॅट खरेदी करू. मी त्यांच्यासाठी माझ्या वडिलांना मारू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. दीपकला नोकरीत बढतीसाठी ५ लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यासाठी त्याने माझ्यावर दबाव आणला होता. मग मी गहू विकताच दिव्याला १.५ लाख रुपये दिले. यानंतर, ९ जूनला सोन्याचे कडे गहाण ठेवून दोन लाख रुपये दिले. तरीही ते अजून पैसे मागत होते, असं मगनने म्हटलं.

लग्नाच्या दीड वर्षानंतर, मला कळले की दिव्या आधीच विवाहित होती आणि तिला एक मुलगा आहे. तिने घटस्फोट न घेता माझ्याशी लग्न केले. जेव्हा मी या प्रकरणात वकिलाचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी मला तिच्याविरुद्ध खटला दाखल करण्यास सांगितले. तरीही, मी तक्रार केली नाही आणि तिच्या पहिल्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी पैसे दिले होते, असंही मगनने म्हटलं.

 २०१९ मध्ये मगनचा दिव्याशी सोशल मीडियावर बोलणं झालं होतं. त्यानंतर दोघांनीही लग्न केले. सुरुवातीला कुटुंबातल्या लोकांना हे मान्य नव्हतं. मात्र जेव्हा दिव्याने मुलाला जन्म दिला तेव्हा कुटुंबातील सदस्यांनीही होकार दिला. दिव्या २० मार्च २०२५ रोजी नोकरीसाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिच्याशी १-२ वेळा फोनवर बोलणं झालं, पण ती घरी परतलीच नाही. नंतर कळले की ती तिच्या प्रियकर दीपकसोबत महाराष्ट्रातील इगतपुरी येथे राहत होती. तिथून फोन करून ती मगनला त्रास देत होती, असं कुटुंबियांनी म्हटलं. 

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस