जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 19:44 IST2021-11-08T17:22:38+5:302021-11-08T19:44:49+5:30
Suicide Case : आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे.

जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या
अतुल आंबी
इचलकरंजी : जर्मनी गँगकडून खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केली. आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने मृत्यूपूर्वी आपल्यावर होणार्या अन्यायाबाबतची चिठ्ठी स्टेटसला ठेवली होती. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीचे काम सुरू आहे. याबाबत दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
येथील जवाहरनगरात आदित्य महाद्वार हा आई, वडिल यांच्यासमवेत राहण्यास आहे. तो Accountingचे काम करीत होता. रविवारी दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्त्या केली. आत्महत्तेपूर्वी त्याने मोबाईलवर मृत्यूपूर्वीची चिठ्ठी स्टेटसला ठेवल्याचे उघडकीस आले आहे. काही मित्रांना ही चिठ्ठी बघून त्याच्या घरी पोहोचेपर्यंत आदित्यने आत्महत्या केली होती. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत जर्मनी गँगमधील चौघांची नावे असून यापूर्वीही त्यांनी सोन्याची अंगठी व 25 हजार रुपये धमकावून काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर पुन्हा खंडणी न दिल्यास कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे हे कृत्य केल्याचे लिहून खाली सही केली आहे. ही चिठ्ठी सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. पोलिसांनी त्याचा मोबाईल घेतला.