कुस्तीच्या कोचने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; जीवे करण्याचीही दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 19:58 IST2021-03-29T19:57:01+5:302021-03-29T19:58:29+5:30

Wrestling coach rapes minor girl : याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुस्ती कोचला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

Wrestling coach rapes minor girl; He also threatened to kill her | कुस्तीच्या कोचने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; जीवे करण्याचीही दिली धमकी

कुस्तीच्या कोचने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; जीवे करण्याचीही दिली धमकी

ठळक मुद्दे१४ वर्षीय पीडित मुलगी हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती सध्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे.

एका कुस्ती कोचने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून कुस्ती शिकण्यासाठी संबंधित कोचकडे गेली होती. त्यावेळी आरोपीने गैरफायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला आहे. भामट्या कोचने घटनेची वाच्यता कुठेही केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुस्ती कोचला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

१४ वर्षीय पीडित मुलगी हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती सध्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे.  आरोपी तरुण सोनूने गावातील सरकारी शाळेत कुस्तीचा आखाडा सुरू केला आहे. तो शाळेतील मुलांसोबत मुलींनाही कुस्तीचे ट्रेनिंग देतो. आरोपीची मुलगी देखील याठिकाणी कुस्तीचे ट्रेनिंग घेते. दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे पीडित विद्यार्थिनीही कुस्ती शिकण्यासाठी आरोपी सोनूकडे जात होती. २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी इतर मुलींच्या कुस्ती शिकण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी सोनू एकटाच कुस्तीच्या आखाड्याच्या स्थळी होता. यावेळी त्याने पीडितेला एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन कोचने पीडितेला आखाड्याच्या एका खोलीत नेलं आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर घटनेची वाच्यता कुठेही केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय केल्यानंतर पोलिसांनी आरोपी कोचला अटक केली आहे. आरोपी कोचच्या विरुद्ध पॉक्सो, बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि एससीएसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Web Title: Wrestling coach rapes minor girl; He also threatened to kill her