शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटू सुशील कुमारला अटकेनंतर भारतीय रेल्वेने केले निलंबित; आता नोकरीही गेली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:59 IST

Wrestler Sushil Kumar suspended by Railways : हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्देसुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील.

नवी दिल्ली - कुस्तीपटू सागर धनखड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर पदावरून निलंबित केले आहे. सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील. सुशीलला कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात  २ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.'क्राईम सीन केला रिक्रिएट'तत्पूर्वी, सुशीलला मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी क्राईम सीन रिक्रियेत करण्यासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये नेले होते. पोलीस पथक सकाळी गुन्हा घडला त्या जागेवर गेले होते आणि क्राईम सीन क्रिएट करून दुपारपर्यंत परत आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचे एक पथक छत्रसाल स्टेडियममध्ये तपासासंदर्भात गेले होते. घटनेच्या दिवशी गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला हे जाणून घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सुशील कुमार यालाही घटनास्थळी नेण्यात आले.सुशीलची ४ तास चौकशी करण्यात आलीसोमवारी सुशीलवरही सुमारे ४ तास चौकशी केली गेली. अधिकाऱ्यांनीसांगितले की, ते या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, सुशील कुमारची या घटनेची चौकशी करण्यासाठी विचारपूस केली गेली, कोणत्या परिस्थितीत हा गुन्हा कुठे झाला आणि तो घटनेनंतर कुठे गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. छत्रसाल स्टेडियमवर 4 ते 5 मे दरम्यान मध्यरात्री सुशील आणि त्याच्या साथीदारांवर झालेल्या हल्ल्यात २३ वर्षीय कुस्तीपटूचा मृत्यू झाला आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले. या घटनेमागील कारण मॉडेल टाऊन परिसरातील एका मालमत्तेवरील वाद असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारsuspensionनिलंबनrailwayरेल्वेPoliceपोलिसDeathमृत्यूWrestlingकुस्तीArrestअटक