शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फॉलो करून पावणेचार कोटींचे सोने लांबविले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:24 AM

व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याची चक्क ‘कोटीत’ किंमत मोजावी लागली.

ठळक मुद्देचार जणांना ४८ तासांत जेरबंद : पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे :  व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याची चक्क ‘कोटीत’ किंमत मोजावी लागली. जिथे जाईल तिथे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेट ठेवण्याचे काम तो करीत असे. चोरट्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ज्या गावात व्यापारी सोने खरेदीला गेल्याची माहितीदेखील त्यांच्या स्टेटसवरूनच चोरट्यांना समजली. शेवटी चोरट्यांनी कट करून तब्बल पावणेचार कोटींचे सोने लांबविले; मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले. दौंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरासमोर दोन जणांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने गाडीत बसवून त्यांच्याकडून सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम पळविणाºया चार जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ७० लाख ७१ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना सहा नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मौजे दौंड गावच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी अप्पा श्रीराम कदम (रा. कौठळी, ता. आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याच्या तपासाबद्दल माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : गणेश दगडू पवार (२७), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (२३, दोघेही रा. महूद, नागणखोरा, जि. सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलानी (२५), प्रथमेश विजय भांबुरे (२६, दोघेही रा. दिगंची, कटफळगल्ली, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली असून, त्यातून ९ किलो ५०० ग्रॅम इतक्या वजनाचे २९ बिस्कीट, सोन्याच्या ३ मोठ्या पट्ट्या, ४ मोबाईल फोन, एक एअर गन असा ३ कोटी ७० लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे......फिर्यादी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्याची सवय होती; तसेच ते नेहमी दौंड येथे उतरून सोने घेऊन जात असे. आरोपींनी फिर्यादींचे व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसवरून फिर्यादीवर पाळत ठेवली. फिर्यादी यांनी सोन्याचे बिस्कीट घेऊन जाताना ‘गुडबाय कौठळी’ असे स्टेटस ठेवले होते. ते आरोपींनी वाचल्यानंतर, त्यांना फिर्यादी घर सोडून सोने आणण्याकरिता गेले असल्याची खात्री पटली. त्यांनी तातडीने फिर्यादींना लुटण्याचा कट तयार क रून त्यांच्याकडील सोने लुटले. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्यासह पोलीस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, पोलीस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांनी तपासकामात महत्त्वाची भूमिका बजावली.   

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपGoldसोनंtheftचोरीPoliceपोलिस