अंगावर पेट्रोल ओतून कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 21:18 IST2019-09-27T21:17:43+5:302019-09-27T21:18:51+5:30
सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात ही घटना घडली आहे.

अंगावर पेट्रोल ओतून कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक - अंगावर पेेट्रोल ओतून एका घंटागाडी कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेतले. अंगावर पेट्रोल ओतून घेत एका घंटागाडी कर्मचाऱ्याने स्व:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात ही घटना घडली आहे.
सुनील विटकर (वय ३३, रा. जेपी नगर) असे अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ईएसआयएस रुग्णालयाच्या मोकळ्या पटांगणात ही घटना घडली आहे. सुनिल विटकर याने बॉटलमध्ये पेट्रोल आणत अंगावर टाकून स्वत:ला पेटवून घेतलेे. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून ९५% भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सुनिलचे लग्न झाले एसून पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच कारण अद्याप समजू शकले नाही.