शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 23:04 IST

महिलेचा पती कामावर गेलेला होता. तर मुलगी किराणा दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. घरात कुणीच नव्हते, त्यावेळी तिने टोकाचं पाऊल उचललं.

ठळक मुद्दे४५ वर्षीय रचना सेठ यांनी १ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रचना सेठ यांची मुलगी कशीश सध्या बी.कॉमच्या अंतिम वर्षात शिक्षण घेते.

मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्यानंतर ठेवीदार असलेली ४५ वर्षीय रचना सेठ तणावात होत्या.  बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही महिला तणावग्रस्त झाली होती. त्यानंतर 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा महिलेच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्यानंतर तिने आत्महत्या केली, असं महिलेच्या कुटुंबीयांनी म्हणणे आहे.

 

१ जुलै रोजी मुलुंड परिसरात घटना घडली. ४५ वर्षीय रचना सेठ यांनी १ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी या महिलेचा पती कामावर गेलेला होता. तर मुलगी किराणा दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. घरात कोणीच नव्हते, त्यावेळी तिने टोकाचं पाऊल उचललं.

पीएमसी बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर ती प्रचंड तणावाग्रस्त जीवन जगत होती. गेल्या महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली. त्यानंतर तिची परिस्थिती आणखी बिघडली होती,” असं रचना शेठ यांचे पती विशाल सेठ यांनी सांगितलं. विशाल सेठ हे मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत.“पीएमसी बँकेतील पैसे बुडाल्यामुळे कुटुंबाचं आर्थिक नुकसान झाल्याच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून रचना मध्यरात्री उठून  रडत बसायची. मागील काही आठवड्यांपासून ती सोबत ओढणी ठेवायची. त्यामुळे आम्ही नेहमी चिंतेत असायचो,” विशाल सेठ म्हणाले. विशाल सेठ यांचे पीएमसी बँकेत १५ लाखांपेक्षा पैसे जमा केलेले होते. आम्ही मागील काही महिन्यांपासून एका मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन तिला जात होतो,” असं देखील विशाल सेठ यांनी पुुढे सांगितलं.रचना सेठ यांची मुलगी कशीश सध्या बी.कॉमच्या अंतिम वर्षात शिक्षण घेते.

टॅग्स :Suicideआत्महत्याSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPMC Bankपीएमसी बँकMumbaiमुंबई