दुबईत नोकरीचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, कुटुंबीयांनी मोदी सरकारकडे मागितला मदतीचा हात 

By पूनम अपराज | Published: December 12, 2020 09:19 PM2020-12-12T21:19:33+5:302020-12-12T21:21:35+5:30

Cheating :परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांना पाच पीडितांच्या कुटुंबीयांनी याबाबत पत्र लिहिले आहे.

Women cheated by offering job in Dubai, family members ask help from Modi government | दुबईत नोकरीचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, कुटुंबीयांनी मोदी सरकारकडे मागितला मदतीचा हात 

दुबईत नोकरीचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, कुटुंबीयांनी मोदी सरकारकडे मागितला मदतीचा हात 

googlenewsNext
ठळक मुद्देतेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील या सर्व पीडित महिला आहेत. बदरुनिसा नावाच्या महिलेने या प्रकरणात सफी या ट्रॅव्हल एजंटवर फसवणुकीचा आरोप केला आहे.

परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केलेल्या घटना वारंवार घडत असून एका ट्रॅव्हल एजंटवर विश्वास ठेवून दुबईत नोकरीसाठी गेलेल्या आठ महिलांच्या फसवणुकीची एक घटना आता उघडकीस आली आहे. या महिलांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी मोदी सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांना पाच पीडितांच्या कुटुंबीयांनी याबाबत पत्र लिहिले आहे.

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील या सर्व पीडित महिला आहेत. बदरुनिसा नावाच्या महिलेने या प्रकरणात सफी या ट्रॅव्हल एजंटवर फसवणुकीचा आरोप केला आहे. एकूण आठ मुलींना फसवण्यात आले आहे. दुबईत मॉलमध्ये सेल्समनची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यांच्या मुलीला परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून दुबईला नेलं, आता तिला तिथे त्रास दिला जात आहे, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

एका अन्य पीडित महिलेची बहिण शमिना बेगम यांनी देखील सफीवर आरोप केले आहेत. “ तो आपल्या बहिणीला नोकरीस लावण्याची बतावणी करून ऑक्टोबर महिन्यात दुबईला घेऊन गेला आणि तिची फसवणूक केली. आता तिला भारतामध्ये परत येण्याची इच्छा आहे. तिला आपल्या देशात येण्यापासून रोखलं जातं आहे, भारत सरकारने लवकरात लवकर आमची मदत करावी”, अशी मागणी पीडित महिलांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पीडित मुलींना ज्या कामाचं आश्वासन देऊन दुबईमध्ये नेण्यात आलं होतं, ते काम त्यांना मिळाले नाही. पीडित मुलींना भारतामध्ये परत आणण्यासाठी एजंट कुटुंबियांकडून दीड लाख रुपयांची मागणी करत आहे. आम्ही गरीब कुटुंबातील असून इतकी रक्कम देणं आम्हाला शक्य नाही, त्यामुळे मोदी सरकारने या प्रकरणात तातडीनं लक्ष द्यावं आणि दुबईत अडकलेल्या आमच्या मुलींची सुटका करावी अशी मागणी या मुलींच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Women cheated by offering job in Dubai, family members ask help from Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.