नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 19:43 IST2020-07-09T19:38:51+5:302020-07-09T19:43:09+5:30

सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे तर प्लॅस्टिकच्या बॅगेत मुंडक ठेवल्याचे आढळून आले.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Woman's chopped body stuffed in suitcase, polythene bags found in UP's Barabanki | नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं  

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं  

ठळक मुद्देया महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.या महिलेचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

बाराबंकी - बंद पडलेल्या कारखान्याजवळ सूटकेसमध्ये अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. मंगळवारी रात्री ही सुटकेस पोलिसांना सापडली. या सूटकेसमध्ये नग्न महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते. सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे तर प्लॅस्टिकच्या बॅगेत मुंडक ठेवल्याचे आढळून आले.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सर्कल ऑफिसर सुशील कुमार सिंग यांनी सांगितले की. या हत्येप्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान सूटकेसजवळ एक सूट आणि चादरही सापडली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची आधी हत्या झाली असावी आणि त्यानंतर अज्ञाताने मृतदेहाचे तुकडे या सूटकेसमध्ये भरून निर्जन ठिकाणी टाकले असावेत. मृतदेह सडायला सुरुवात झाली असल्याचे देखील पोलिसांनी यावेळी सांगितलं. या महिलेचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले, दोन दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असावा आणि तो सडल्याने दुर्गंध येऊ लागल्याने लोकांनी याबाबत माहिती दिली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरातील सफेदाबाद इथे घडली आहे. पोलिसांच्या तपासात काही अंतरावर एक प्लास्टिकची बॅग आढळली. त्यात महिलेचे मुंडकं आणि पाय सापडला तर उर्वरित शरीराचे तुकडे सुटकेसमध्ये सापडले. या प्रकरणी सध्या पोलिसांना तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

Web Title: Woman's chopped body stuffed in suitcase, polythene bags found in UP's Barabanki