शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 21:10 IST

Kidnapping Case : चाकण पोलीस : अपहृत बाळाची सुखरुप सुटका

ठळक मुद्देराणी शिवाजी यादव (वय २८, रा. कुत्तर विहीर, आंबेजोगाई, जि. बीड), असे आरोपी महिलेचे नाव आहे.

पिंपरी : गर्भपात झाल्याचे पती व घरच्यांपासून लपवून चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून बाळाची सुखरून सुटका करण्यात आली आहे. बाळ पळवून नेल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी चाकण येथे घडली होती.  

राणी शिवाजी यादव (वय २८, रा. कुत्तर विहीर, आंबेजोगाई, जि. बीड), असे आरोपी महिलेचे नाव आहे. धनश्री राजेंद्र नागपुरे (वय चार महिने) असे चिमुकलीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय ५३, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली होती. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपुरे राहत असलेल्या ठिकाणी आरोपी महिला १७ फेब्रुवारी रोजी काम मिळवण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर नागपुरे यांची मुलगी धनश्री हिला घरातून घेऊन निघून गेली. याबाबत गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. बाळाचे अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती. मात्र, गुन्हा घडल्यानंतर ती बेपत्ता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशय बळावल्याने आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार करून तिचा पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी महिलेला पोलिसांनी अंबेजोगाई येथून चार महिन्यांच्या बाळासह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले.

बाळाचे जन्मदाते वेगळेचफिर्यादी राजेंद्र नागपुरे व त्यांची पत्नी हे दाम्पत्य अपहृत बाळाचे जन्मदाते नाहीत, ही बाब तपासात समोर आली. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेमसंबंधातून हे बाळ झाले होते. त्या जोडप्याने नागपुरे दाम्पत्याच्या नावाचा वापर करून चाकण येथील एका दवाखान्यात बाळाला जन्म घातला. त्यानंतर नागपुरे यांना ते बाळ देऊन टाकले. बाळाचा सांभाळ करत असले तरी नागपुरे हे त्याचे जन्मदाते नसून अन्य जोडपे असल्याचे समोर आले.

बाळाला सांभाळण्याचा केला बहाणाआरोपी राणी हिचा गर्भपात झाला. मात्र त्याबाबत घरच्यांना सांगितले नाही. त्यामुळे तिला एका नवजात बाळ पाहिजे होते. दरम्यान, नागपुरे हे बाळाचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेच्या शोधात होते. याबाबत आरोपी राणी हिला माहिती मिळाली. बाळाला सांभाळण्याच्या बहाण्याने नागपुरे यांच्याकडे आल्यानंतर चार महिन्यांच्या धनश्री हिला घेऊन ती पळून गेली.

टॅग्स :KidnappingअपहरणPuneपुणेPoliceपोलिस