लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला महिलेने संपवले, पतीसोबत रचला हत्येचा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:40 IST2022-03-15T13:32:18+5:302022-03-15T13:40:34+5:30
Murder Case : पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा खुलासा केला, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रकरण नोएडातील बदलपूर भागातील आहे.

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला महिलेने संपवले, पतीसोबत रचला हत्येचा कट
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीसह प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा खुलासा केला, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रकरण नोएडातील बदलपूर भागातील आहे.
प्रियकराला आपल्या रस्त्यावरून हटवण्यासाठी महिलेने पतीसोबत हा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि मयताचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.
प्रत्यक्षात ११ मार्च रोजी बदलपूर परिसरात नीरज नावाच्या व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, नीरज हा गेल्या दोन वर्षांपासून श्रावण नावाच्या व्यक्तीच्या पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. नीरजला दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे त्याचे महिलेशी वारंवार भांडण होत असे, त्यामुळे तिने पतीसोबत नीरजला मारण्याचा कट रचला.
यानंतर ११ मार्च रोजी दोघांनी मिळून नीरजला दारू पाजली आणि त्याच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिचा पती श्रावण दास यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी बिहारमधील भागलपूरचे रहिवासी आहेत.