Woman tahsildar burnt to death In Telangaga's Rangareddy District | धक्कादायक! महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळले
धक्कादायक! महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळले

हैदराबाद -  महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या महिलातहसीलदाराचा मृत्यू झाला आहे. तर या महिला तहसिलदाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात हा क्रूर प्रकार घडला आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात हा क्रूर प्रकार घडला आहे. विजया असे या हल्ल्यात बळी पडलेल्या महिला तहसिलदाराचे नाव आहे. महिला तहसीलदारांवर हल्ला झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान ते दोघेही होरपळले. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी विजया यांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती तहसिलदार कार्यालयात आली. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसिलदार विजया यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. आगीचा भडका  उडाल्याने त्यात गंभीररीत्या भाजून सदर महिला तहसिलदाराचा मृत्यू झाला. तर त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान, आरोपी व्यक्ती फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही व्यक्ती कोण होती, तसेच त्या व्यक्तीने हे कृत्य का केले हे समजू शकलेले नाही.  

 

Web Title: Woman tahsildar burnt to death In Telangaga's Rangareddy District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.