"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:45 IST2025-10-26T09:44:31+5:302025-10-26T09:45:16+5:30
रायपूरच्या डीडी नगर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
रायपूरच्या डीडी नगर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड केला ज्यामध्ये तिने तिच्या पती आणि सासऱ्यांनी खूप छळ केल्याचा गंभीर आरोप केला. "मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..." असं म्हटलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत न्याय आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहेत. डीडी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट करण्यासाठी पोलीस मोबाईल व्हिडीओ आणि इतर डिजिटल पुरावे देखील तपासत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, व्हिडीओ आणि इतर डिजिटल डेटा तपासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
कुटुंब आणि शेजाऱ्यांच्या जबाबांवरूनही या प्रकरणातील सत्य समोर येईल. डीडी नगर पोलीस या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. परिसरात खळबळ उडाली आहे.