Crime News: भाच्याच्या मदतीने मामीनेच आखला प्लॅन, अनैतिक संबंधातून पतीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 20:33 IST2022-07-21T20:30:56+5:302022-07-21T20:33:21+5:30
साकीनाका पोलीस ठाणे येथे अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीने संबंधित प्रकरणी तक्रारी दाखल केली

Crime News: भाच्याच्या मदतीने मामीनेच आखला प्लॅन, अनैतिक संबंधातून पतीचा खून
मुंबई - सकिनाका परिसरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्ती नसीम शेख यांची बायको रुबिना शेख आणि भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांचे प्रेमसंबंध होते असा संशय नसीमला होता. म्हणून, नसीमने रुबिनाचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. या सर्व त्रासाला कंटाळून रुबिनाने प्रियकर मोहमद फारुकी याच्या मदतीने पती नसीमचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका पोलीस ठाणे येथे अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीने संबंधित प्रकरणी तक्रारी दाखल केली. सुन रूबीना शेख व तिचा प्रियकर साथीदार यांनी संगनमत करून २२ वर्षीय मुलगा नसीम शेख याला वैयक्तिक घरगुती भांडणावरून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, निगराणी पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक लोणकर तसेच पोलीस शिपाई बनसोडे यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला.
तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून शोध घेत आरोपी रूबीना व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. रूबीना व सैफ यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्वक विचारणा केली. त्यावेळी, आरोपी रुबीनाने तिने व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी याच्याशी संगनमत करुन नसीम शेख याचा गळा दाबुन खून केल्याचे सांगितले. त्यावरून दोन्हीही आरोपींना हत्येच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नसीम शेख हा रुबीनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ करत असल्याने छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासादरम्यान सांगितले.