डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:04 IST2025-07-01T10:03:43+5:302025-07-01T10:04:29+5:30

हत्येनंतर प्रियकरासोबत मिळून शंकरमूर्तीचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळपास ३० किमी अंतरावर जात एका विहिरीत फेकून दिला.

Wife kills husband with lover in Karnataka, 2 accused arrested | डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

बंगळुरू - हनीमूनसाठी मेघालयला गेलेल्या सोनम आणि राजा रघुवंशी हत्याकांडाने सगळ्या देशाला हादरवलं होते. त्यानंतर अनेक राज्यातून अशा बातम्या समोर येऊ लागल्या ज्यात पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. यातच आता कर्नाटकातील तुमकुरू येथे अशीच घटना घडली आहे. याठिकाणी एका महिलेने ५० वर्षीय पतीची हत्या केली. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने पतीचा मृतदेह ३० किमी दूर अंतरावर फेकून दिला. या घटनेत पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.

माहितीनुसार, तुमकुरू जिल्ह्यातील तिप्तूर परिसरात मंगळवारी ही घटना घडली. शंकरमूर्ती नावाचा व्यक्ती एका फार्महाऊसवर एकटाच राहायला होता. त्याची पत्नी सुमंगला आणि प्रियकर नागराजू या दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. आपल्या प्रेमात पती शंकरमूर्तीचा अडथळा असल्याचे ते मानत होते. सुमंगला तिप्तूरच्या कल्पतरू गर्ल्स हॉस्टेलमधील किचनमध्ये काम करायची. एकेदिवशी सुमंगलाने पती शंकरमूर्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्याला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पायाने त्याचा गळा दाबला, यात शंकरमूर्तीचा मृत्यू झाला. हत्येनंतर प्रियकरासोबत मिळून शंकरमूर्तीचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळपास ३० किमी अंतरावर जात एका विहिरीत फेकून दिला.

मिरची पावडरमुळे मिळाला पुरावा

पोलिसांनी या प्रकरणी शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा शंकरमूर्तीच्या बिछान्यावर मिरची पावडर आणि वस्तू विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या. पोलिसांनी पत्नी सुमंगला हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. खाकीचा धाक दाखवताच सुमंगलाने तिचा गुन्हा कबूल केला. सुमंगला आणि शंकरमूर्ती यांच्यात नागराजूसोबत असलेल्या नात्यावरून अनेकदा भांडण झाले होते. 

दरम्यान, सहा महिन्यापूर्वी सुमंगला तिच्या पतीपासून वेगळी झाली होती. तिने तिच्या मुलीचे लग्नही न विचारता केले होते. त्यामुळे नाराज शंकरमूर्तीने तिला रागात जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सुमंगला आणि नागराजू या दोघांनी मिळून त्याचा काटा काढायचे ठरवले. शंकरमूर्तीच्या हत्येचं प्लॅनिंग बनवले आणि त्याला मारून टाकले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Wife kills husband with lover in Karnataka, 2 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.