Wife Killed Her Husband: पती दुसऱ्या महिलेशी करायचा अश्लील चॅटिंग; पत्नीने चार्जर केबलने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:50 PM2022-07-15T19:50:14+5:302022-07-15T19:51:22+5:30

Extra Marital Affair: दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याने नाराज झालेल्या महिलेने आपल्या पतीचा खून केला.

Wife Killed husband with Mobile Charger cable as he had extra marital affair with another woman murder | Wife Killed Her Husband: पती दुसऱ्या महिलेशी करायचा अश्लील चॅटिंग; पत्नीने चार्जर केबलने घेतला जीव

Wife Killed Her Husband: पती दुसऱ्या महिलेशी करायचा अश्लील चॅटिंग; पत्नीने चार्जर केबलने घेतला जीव

googlenewsNext

Wife Killed Her Husband: भारत हा एक असा देश आहे जेथे विवाहसंस्थेला प्रचंड महत्त्व आहे. पण काही वेळा अशा घटना घडतात ज्यामुळे नात्याची प्रतिष्ठा धुळीस मिळते. अशीच एक बातमी सध्या चर्चेत आहे. या घटनेत एका पतीने दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे पत्नीने त्याची हत्या केल्याची घटना घडली. तिचा नवरा तिच्यासमोर दुसऱ्या महिलेसोबत अश्लील चॅटिंग करत असे. त्यामुळे तिचा राग अनावर झाल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

महिलेचा पती आपल्या पत्नीसमोरच एका दुसऱ्या महिलेश चॅटिंग करायचा. इतकेच नव्हे तर त्या चॅटिंग मध्ये अश्लील मेसेजचाही समावेश होता. या गोष्टीकडे पत्नीने आधी दुर्लक्ष केले पण अखेर पतीच्या कृत्याला कंटाळून महिलेने पतीला मारण्याचा कट रचला आणि संधी मिळताच त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली. राजस्थानच्या फतेहपूर शेखावटी येथील रहिवासी असलेल्या मदीनाने आपल्या पतीची हत्या केली. तसेच पोलिसांनी आपल्याला अटक करू नये यासाठी तिने स्वत:देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रसार माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, ६ वर्षांपूर्वी मदीनाने मकसूद सोबत लग्न केले होते. दोघांनाही मूल-बाळ नसल्याने दोघेही चिंतेत होते. पण मकसूदचे या काळात दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू झाले. इतकेच नव्हे तर मदिनासमोर तिचा पती मकसूद दुसऱ्या महिलेसोबत अश्लील चॅट आणि व्हिडिओ कॉल करायचा. हे मदीनाला अजिबात रूचत नव्हते. त्यामुळे ती मकसूदला मारण्याचा कट रचत होती. जुलै महिन्याच्या सुरूवातीला मदीना, तिची सासू आणि पती मकसूदसोबत लग्न समारंभाला गेली होती. मकसूद आधी परतला, तर मदीना त्यानंतर एका तासाने आली. त्यावेळीच तिने त्याला ठार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकसूद पहाटे २ वाजता तर मदीना ३ वाजता परतली. ती परत आली तेव्हा मकसूद झोपला होता. मदीना आधीच त्याच्या विचित्र कृत्यांना कंटाळली होती. त्यामुळे संधी मिळताच तिने आधीच बनवलेला दुपट्ट्याचा फास त्याच्या भोवती आवळला. त्यानंतर तिने मोबाईलच्या चार्जरची वायरही वापरली आणि गळा दाबून त्याचा खून केला.

Web Title: Wife Killed husband with Mobile Charger cable as he had extra marital affair with another woman murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.