Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 00:50 IST2026-04-10T00:42:29+5:302026-04-10T00:50:44+5:30
Wife Husband Crime News: एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात ती पत्नीची हत्या केल्याचे सांगत आक्रोश करतेय. पण, जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, तेव्हा तेही चक्रावून गेले.

Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
एक महिला हमसून हमसून रडतेय. इतर महिला तिला धीर देताहेत. आक्रोश करणाऱ्या महिलेचे नाव आहे प्रियंका पुरोहित! प्रियंकाचा पती देवकृष्ण पुरोहित याची हत्या झाली. पत्नी प्रियंका म्हणाली घरात चोर घुसला होता, त्याने दागिने नेले आणि पतीची हत्या केली. सगळ्यांना हे खरं वाटलं. तिचा आक्रोश बघून आजूबाजूच्या लोकांनाची मने हेलावून गेली. पण, हे सगळे घडवून आणलेलं हत्याकांड उघडकीस आलेच.
पतीच्या हत्येनंतर महिलेचा व्हिडीओ बघा
Priyanka Purohit from Dhar, MP, faked a robbery: tied up with husband, claimed looters killed him & stole valuables. Police found items hidden in her room. She conspired with lover, paid ₹1L to contract killer. Oscar-level acting in tears, busted in hours. Pure evil😡 pic.twitter.com/mWhbF9FuiR
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 9, 2026
ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील गोंदी खेडा चारण गावात. हे गाव धार जिल्ह्यात येते. प्रियंका पुरोहितचे कमलेश याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून देवकृष्ण पुरोहितची हत्या करण्याचा कट रचला आणि हत्या केली.
प्रियंक म्हणाली चोर आला, त्याने हत्या केली
देवकृष्ण आणि प्रियंका घरात झोपलेले होते. त्याचवेळी सुरेंद्र घरात घुसला आणि त्याने देवकृष्णच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रियंकाचे हातपाय बांधण्यात आले. तिला दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवण्यात आले.
देवकृष्णची हत्या झाल्यानंतर प्रियंकाने आरडाओरड सुरु केली. तिच्या आवाजाने आजूबाजूचे लोक गोळा झाले. तिने जोरजोरात रडत होती. पतीची चोराने हत्या केल्याचे ती सांगून लागली. सगळा घटनाक्रम सांगतानाचा तिचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटले. कारण चोर पतीची हत्या करून दागिने घेऊन गेल्याचे ती म्हणाली, पण दागिने तिच्याच खोलीत होते. मग पोलिसांनी तिलाच ताब्यात घेऊन चौकशी केली.
१ लाख रुपयात दिली हत्येची सुपारी
पोलिसांनी दम भरताच प्रियंकाने पतीची हत्या स्वतःच घडवून आणल्याची कबूली दिली. तिने आणि कमलेशन हत्येचा प्लॅन बनवला. एक लाख रुपयांमध्ये देवकृष्ण पुरोहित याच्या हत्येची सुपारी दिली होती. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याला संपवले. पोलिसांनी प्रियंका आणि कमलेश या दोघांनाही अटक केली असून, हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.