गस्तीवरील पोलिसाशी संबंधांसाठी सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायची पत्नी; एका रात्री डोळे उघडताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:45 AM2021-05-15T10:45:08+5:302021-05-15T10:46:15+5:30

extra marital affaire of jeweler in UP: धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या केंट पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या ठाण्याचा पोलीस शिपाई एका भागात रोज रात्री गस्त घालायचा. यावेळी सराफाची पत्नी आणि त्याची ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या जवळ आहे, एवढे की लैंगिक संबंध ठेवू लागले.

Wife of jeweler extra marital affaire with police, giving sleeping pills to husband at night, Exposed | गस्तीवरील पोलिसाशी संबंधांसाठी सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायची पत्नी; एका रात्री डोळे उघडताच...

गस्तीवरील पोलिसाशी संबंधांसाठी सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायची पत्नी; एका रात्री डोळे उघडताच...

Next

Crime News:  बरेली : केंट पोलीस ठाणे क्षेत्रात रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस शिपायाचे (Police round) तेथे राहणाऱ्या एका सराफाच्या पत्नीशी प्रेमसंबंध (Affaire with jeweler wife) जुळले होते. या पोलिसाने सराफाच्या पत्नीला त्याच्या प्रेमजाळ्यात ओढले होते. यामुळे ती महिला आपल्या पतीला रोज रात्री दूधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्या पोलिसासोबत रात्र घालवत होती. एक दिवस सराफाचा डोळा उघडला अन् पत्नीचे पितळ उघड पडले. (Wife of jeweler extra marital affaire with police, giving sleeping pills to husband at night.)


हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या केंट पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या ठाण्याचा पोलीस शिपाई एका भागात रोज रात्री गस्त घालायचा. यावेळी सराफाची पत्नी आणि त्याची ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या जवळ आहे, एवढे की लैंगिक संबंध ठेवू लागले. यासाठी पोलिसाच्या सांगण्यावरून पत्नीने सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. यामुळे सराफ लगेचच गाढ झोपू लागला. तो झोपल्यानंतर त्याची पत्नी पोलीस शिपायाला फोन करायची. यानंतर पोलीस शिपाई गस्त सोडून तिच्या घरी रात्र घालवायचा.


पितळ कसे उघडे पडले...
एका रात्री सराफाचे पोट बिघडले होते. यामुळे त्याने पत्नीने दिलेले दूध पिले नाही आणि झोपी गेला. पत्नी नेहमीच्या धुंदीत सराफाने दूध पिले असेल असे गृहीत धरले आणि झोपला असेल म्हणून प्रियकर पोलिसाला फोन केला. तो घरी आला आणि नेहमीप्रमाणे त्यांच्यात गुफ्तगु सुरु झाले. याचवेळी सराफाला जाग आली आणि त्याने या दोघांना आपत्तीजनक परिस्थितीत बेडवर पाहिले.


सराफाने पत्नी आणि शिपायाच्या शरिरसंबंधाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन करून रात्रीच बोलवून घेतले. त्याने पुरावा म्हणून तो व्हिडीओच पोलिस अधिकाऱ्याला दाखविला आणि शिपायाविरोधात गुन्हा दाखल करायला लावला. पोलिस अधिकाऱ्याने याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिली, त्यांनी शिपायाला पोलीस मुख्यालयात बोलवून घेत त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. 

Web Title: Wife of jeweler extra marital affaire with police, giving sleeping pills to husband at night, Exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app