"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:48 IST2025-12-08T16:48:01+5:302025-12-08T16:48:42+5:30

एका महिलेने ढसाढसा रडत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

wife files case against husband accusing him of throwing her out of house having illicit relationship | "माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव

"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका महिलेने ढसाढसा रडत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिने आरोप केला की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि त्याच्या गर्लफ्रेंडने तिला घरातून हाकलून लावण्याचा कट रचला होता. तिने असंही म्हटलं आहे की, तिचा नवरा आता तिच्याकडे पैसे मागत आहे आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहे.

हे प्रकरण नंदगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे. हिंदू रीतिरिवाजांनुसार जून २०२५ मध्ये महिलेने त्याच परिसरातील रहिवासी मनजीत चौहानशी लग्न केलं. ती पतीसोबत अत्यंत आनंदाने राहत होती. मात्र लग्नानंतर काही दिवसांनीच तिच्या पतीचं गावातील एका महिलेशी प्रेमसंबंध सुरू झाले, ज्यामुळे तो पत्नीला दररोज मारहाण आणि छळ होत होता. तरीही महिलेने सर्व काही सहन केलं.

ऑक्टोबर २०२५ मध्ये एके दिवशी पतीशी प्रेमसंबंध असलेली ही महिला पतीसोबत तिच्या घरी आली आणि तिच्याशी गैरवर्तन आणि मारहाण करू लागली. मारहाण केल्यानंतर, त्याने तिला घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर तिने भावाला फोन केला आणि तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. आईवडिलांच्या घरी असताना पती तिला अनेक मोबाईल नंबरवरून वारंवार फोन करू लागला आणि जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्याने तिच्याकडे पैसेही मागितले.

महिला घाबरली. यानंतर जेव्हा तिला तिच्या पतीचा फोन आला तेव्हा तिने धमक्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर तिने गाझीपूरच्या पोलीस अधीक्षक आणि गाझीपूरच्या महिला कक्षाकडे तक्रार दाखल केली. आता, पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, नंदगंज पोलिसांनी महिलेच्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: wife files case against husband accusing him of throwing her out of house having illicit relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.