शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

पत्नीचा विष पिऊन मृत्यू तर पतीची फेसबुक लाईव्ह करून रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 12:51 PM

Jalgaon Crime News : विष प्राशनाने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने असोदा रेल्वे गेटजवळ येऊन घटनेबाबत फेसबुक लाईव्ह केले, त्यानंतर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.२० वाजता घडली.

जळगाव : विष प्राशनाने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने असोदा रेल्वे गेटजवळ येऊन घटनेबाबत फेसबुक लाईव्ह केले, त्यानंतर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.२० वाजता घडली. कांचन प्रमोद शेटे (२८) असे पत्नीचे तर प्रमोद तुकाराम शेटे (३२) रा.कांचन नगर असे पतीचे नाव आहे. दरम्यान, कांचन हिची आत्महत्या आहे की हत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र तिच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद व कांचन हे कांचन नगरात दोन मुलींसह वास्तव्याला होते. पत्नी-पत्नीत नेहमीच खटके उडत होते. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला. त्यात कांचन हिने विषप्राशन केले तर प्रमोद याने तसाच घरातून काढता पाय घेत असोदा रेल्वेगेट गाठले. तेथे फेसबुक लाईव्ह करुन खांब क्र.४२२/२ ते ४२२/४  दरम्यान भुसावळकडून येणाऱ्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. यात प्रमोद याच्या शरीराचे दोन तुकडे झाले असून रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे पडले होते. मुंडके असलेले धड व कमरेपासून पाय असलेले धड किमान पाच फुटाच्या अंतरावर होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे हवालदार मनोज इंद्रेकर, किरण वानखेडे व होमगार्ड विजय पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेहाचे दोन्ही तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले. दुसरीकडे कांचन हिला नातेवाईकांनी देवकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनीही रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली.मित्राला ऑडिओ मेसेज केला अन‌् घटना उघड झालीघटनेच्या आधी प्रमोद याने सकाळी ७ वाजता सोबत काम करणाऱ्या मित्राला ऑडीओ मेसेज केला. काही वेळाने मित्राने हा मेसेज ऐकून प्रमोद याच्या नातेवाईकांचे घर गाठले. तेथून प्रमोदची सासू सुरेखा राजेंद्र वाणी, शालक जयेश व मेहुणी प्रियंका यांनी प्रमोदचे घर गाठले असता कांचन मृतावस्थेत होती तर त्यांची दोन्ही लहान मुले गिरीशा व हिरन ही दोघंही झोपलेली होती. कांचनला मृत पाहून आई, भाऊ व बहिणीने हंबरडा फोडताच झोपलेली दोन्ही मुले जागे झाली. त्यानंतर प्रमोदचे आजोबा देविदास शेटे व आजी कमलाबाई यांनी घराकडे धाव घेतली.रेल्वे रुळानजीक मद्य प्राशन केलेप्रमोद याने सकाळीच घर सोडून रेल्वे रुळ गाठले. तेथे एका खोलीजवळ मद्य प्राशन केले. शेवटचा मद्याचा ग्लास भरुन ठेवल्यानंतर त्याने ८.५७ वाजता फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर भुसावळकडून येणाऱ्या रेल्वेखाली झोकून दिले. रेल्वे रुळानजीकच्या खोलीजवळ प्रमोद याने भरलेला दारुचा ग्लास व कोल्ड्रींक्सची बाटली, तसेच रिकामी झालेली दारुची बाटली तेथे आढळून आली. गल्लीतील तरुणांनी ही बाटली पोलिसांना दाखविली.काय आहे फेसबुक लाईव्हमधील संवादसर्वात आधी माझ्या आईला नमस्कार, त्यानंतर माझ्या वडीलांना नमस्कार.. कारण त्यांनी मला जन्म दिला आहे. आणि दुसरा नमस्कार माझे जन्म दिलानंतर ही सुध्दा ज्यांनी माझा सांभाळ केला ते माझे आजी-बाबा (मा आणि आप्पा) यांना नमस्कार... ज्यानी माझा जीवनभर साथ निभावण्याची शपथ घेतली होती, ते आज मरण पावल्यामुळे दोन मिनिटे बोलत आहे, आणि माझा शेवटचा गुड बाय करीत आहे. याच्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही, चेहरा तर मी दाखवूच शकत नाही तुम्हाला. कारण माझी वाईफच या दुनियेत राहिली नाही.आपल्याला पण रहायला इंट्रेस नाही आता...ज्यांना मराठी कळत नसेल त्यांना  सो  स्वॉरी, कारण की मी जन्मापासूनच मराठी आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावFamilyपरिवार