पत्नीने भाजी आणि दुधासाठी पैसे मागितले, पतीने गरम तव्याने चटके दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 15:14 IST2019-02-09T15:12:58+5:302019-02-09T15:14:21+5:30
थेरगाव येथे भाजी आणि दुधासाठी पत्नीने पैसे मागितल्याचा याचा राग आल्याने पतीने पत्नीला गॅसवरील गरम तव्याने चटके दिले.

पत्नीने भाजी आणि दुधासाठी पैसे मागितले, पतीने गरम तव्याने चटके दिले
पिंपरी : भाजी आणि दुधासाठी पत्नीने पैसे मागितल्याचा याचा राग आल्याने पतीने पत्नीला गॅसवरील गरम तव्याने चटके दिले. तसेच जमिनीवर डोके आपटून जखमी केले. ही घटना थेरगाव येथे शुकवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मनाली मंगेश दाभोळकर (वय ३०),तसेच आरोपी मंगेश दत्तात्रय दाभोळकर हे दांपत्य थेरगाव, कैलासनगर येथील सुपर मार्केटजवळ राहण्यास आहे. दैनंदिन घर खर्चासाठी पत्नीने पतीकडे पैसे मागितले. याचा राग आल्याने पतीने गॅसवर ठेवलेला गरम तवा पत्नीच्या अंगावर टाकुन तिला चटके दिले. यामध्ये पत्नीजखमी झाली आहे.