शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'आंघोळ करताना पोलिसांनी नग्न अवस्थेत महिलेला खेचत नेले...', मुलीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:56 IST

Molestation Case : मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण बिनावर पोलीस स्टेशन हद्दीतील चांदौरा गावचे आहे. 9 मे रोजी एकाच कुटुंबातील भांडण प्रकरणी पोलिसांचे पथक छापा टाकत होते.

उत्तर प्रदेशातील बदायूं पोलीस ठाण्यातील बिनावर परिसरात एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. कौटुंबिक कलहाच्या प्रकरणी पोलीस तिच्या मुलीसह इतर कुटुंबीयांना त्रास देत असल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. याला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण बिनावर पोलीस स्टेशन हद्दीतील चांदौरा गावचे आहे. 9 मे रोजी एकाच कुटुंबातील भांडण प्रकरणी पोलिसांचे पथक छापा टाकत होते. तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी ९ मे रोजी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या बाजूने १३ मे रोजी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा सतत छळ सुरू होता. पोलिसांनी तिला आणि मुलीला मारहाण केली आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. आंघोळ करत असताना पोलिसांनी मुलीच्या आईला नग्न अवस्थेत ओढत बाहेर काढल्याचा आरोप आहे. मुलीला हा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.इन्स्पेक्टर संजय गौर आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शहराचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रवीण सिंह चौहान सांगतात की, बिनावर पोलिस स्टेशन हद्दीतील गावात एका अविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीओ सिटी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या तथ्याच्या आधारे कारवाई केली जाईल.

क्राइम :पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेपबदायूंचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ.ओ.पी.सिंग यांनी सांगितले की, आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबातील सर्व लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्याचा एक भाऊ तिहार तुरुंगात बंद आहे. वडील, काका आणि दोन्ही भावांवर डझनाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. या मारहाणीची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला होता. पोलिसांवर कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा असभ्यतेचे आरोप निराधार आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू