शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

व्हाट्स अ‍ॅपला प्रतिष्ठित महिलेचा डीपी लावून दुसऱ्या महिलेबरोबर अश्लिल चॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 2:34 PM

प्रतिष्ठित महिलेचा फोटो व्हाट्सअ‍ॅपच्या डिपी ठेवत दुसऱ्या ३६ वर्षीय महिलेबरोबर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आला आहे.

ठळक मुद्देतरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपीस तत्काळ अटक 

इंदापूर : शहरातील एका प्रतिष्ठित महिलेचा फोटो व्हाट्सअ‍ॅपच्या डीपीला लावून, दुसऱ्या ३६ वर्षीय महिलेबरोबर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी एका तरुणावर रविवारी (दि.१८) इंदापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी सोमवारी रात्री ३ वाजता राहत्या घरातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील आंबेडकरनगर भागातील एक महिला अक्षय प्लास्टिक कंपनीत कामाला असून, त्याच कंपनीत ३ पुरुष कामगार व २ महिला कामगार आहेत. त्यापैकी कंपनीतील कामगार स्वप्निल सुरेश लोखंडे (रा. इरिगेशन कॉलनी, इंदापुर) याने साधारणपणे तीन महिन्यापूर्वी, एका नंबरवरून फिर्यादी महिलेला संदेश पाठवला होता की, 'तु मला आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे' तसेच फिर्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल मेसेज देखील वारंवार पाठवित होता. फिर्यादी महिलेने तिच्या पतीला दाखवले व त्यावेळी फिर्यादीने मोबाईल क्रमांक बदलला. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या पतीने आरोपीला समज दिली होती. तेव्हा आरोपी याने माफी मागितली होती. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये स्वप्निल लोखंडे हा सुट्टीवर गेलेला होता तो ( दि.१६ ) रोजी कामावर रुजू झाला,दरम्यान दि. १२ रोजी सकाळी १० वाजता फिर्यादीच्या मोबाईलवर संदेश आला. त्यावेळी महिलेने व्हाट्सअ‍ॅपचे डीपी तपासले असता त्यावर इंदापूर मधील प्रतिष्ठित महिलेचा डीपी दिसून आला. त्यावेळी फिर्यादीने विचारले की, तुम्ही कोण ? असे विचारले असता, आरोपीने उत्तर दिले की, अंबिकानगरमधील (एका प्रतिष्ठित महिलेचे नाव) असून 'मी लेसबीन आहे' असे संदेश पाठवले. मात्र, फिर्यादी ( दि. १५ ) नोव्हेंबर रोजी डीपीला फोटो असणाऱ्या श्रीराम सोसायटी येथील महिलेला भेटण्यास गेले असता, त्यांना ते चॅटिंग दाखवले असता त्यावेळी खुलासा झाला की तो नंबर त्या महिलेचा नाही. तसेच डीपीवर त्यांचा फोटो बघुन त्याही महिलेने संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांच महिलेने नंबर तपासला असता, तो मोबाईल नंबर इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी येथील त्यांच्याच कंपनीत काम करणारा कामगार स्वप्निल सुरेश लोखंडे यांच्या लहानभावाचा असल्याचे समजले. मात्र, सर्व चॅटिंग स्वप्निल यानेच केल्याचे समजले. त्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशिल लोंढे करत आहेत. काल इंदापूर न्यायालयासमोर आरोपीस हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअॅपCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस