व्हाट्स अ‍ॅपला प्रतिष्ठित महिलेचा डीपी लावून दुसऱ्या महिलेबरोबर अश्लिल चॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 14:37 IST2018-11-20T14:34:06+5:302018-11-20T14:37:15+5:30

प्रतिष्ठित महिलेचा फोटो व्हाट्सअ‍ॅपच्या डिपी ठेवत दुसऱ्या ३६ वर्षीय महिलेबरोबर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आला आहे.

What's app sexual Chatting with doing dp | व्हाट्स अ‍ॅपला प्रतिष्ठित महिलेचा डीपी लावून दुसऱ्या महिलेबरोबर अश्लिल चॅटिंग

व्हाट्स अ‍ॅपला प्रतिष्ठित महिलेचा डीपी लावून दुसऱ्या महिलेबरोबर अश्लिल चॅटिंग

ठळक मुद्देतरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपीस तत्काळ अटक 

इंदापूर : शहरातील एका प्रतिष्ठित महिलेचा फोटो व्हाट्सअ‍ॅपच्या डीपीला लावून, दुसऱ्या ३६ वर्षीय महिलेबरोबर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी एका तरुणावर रविवारी (दि.१८) इंदापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी सोमवारी रात्री ३ वाजता राहत्या घरातून अटक केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील आंबेडकरनगर भागातील एक महिला अक्षय प्लास्टिक कंपनीत कामाला असून, त्याच कंपनीत ३ पुरुष कामगार व २ महिला कामगार आहेत. त्यापैकी कंपनीतील कामगार स्वप्निल सुरेश लोखंडे (रा. इरिगेशन कॉलनी, इंदापुर) याने साधारणपणे तीन महिन्यापूर्वी, एका नंबरवरून फिर्यादी महिलेला संदेश पाठवला होता की, 'तु मला आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे' तसेच फिर्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल मेसेज देखील वारंवार पाठवित होता. फिर्यादी महिलेने तिच्या पतीला दाखवले व त्यावेळी फिर्यादीने मोबाईल क्रमांक बदलला. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या पतीने आरोपीला समज दिली होती. तेव्हा आरोपी याने माफी मागितली होती. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये स्वप्निल लोखंडे हा सुट्टीवर गेलेला होता तो ( दि.१६ ) रोजी कामावर रुजू झाला,दरम्यान दि. १२ रोजी सकाळी १० वाजता फिर्यादीच्या मोबाईलवर संदेश आला. त्यावेळी महिलेने व्हाट्सअ‍ॅपचे डीपी तपासले असता त्यावर इंदापूर मधील प्रतिष्ठित महिलेचा डीपी दिसून आला. त्यावेळी फिर्यादीने विचारले की, तुम्ही कोण ? असे विचारले असता, आरोपीने उत्तर दिले की, अंबिकानगरमधील (एका प्रतिष्ठित महिलेचे नाव) असून 'मी लेसबीन आहे' असे संदेश पाठवले. 
मात्र, फिर्यादी ( दि. १५ ) नोव्हेंबर रोजी डीपीला फोटो असणाऱ्या श्रीराम सोसायटी येथील महिलेला भेटण्यास गेले असता, त्यांना ते चॅटिंग दाखवले असता त्यावेळी खुलासा झाला की तो नंबर त्या महिलेचा नाही. तसेच डीपीवर त्यांचा फोटो बघुन त्याही महिलेने संताप व्यक्त केला. 
त्यानंतर त्यांच महिलेने नंबर तपासला असता, तो मोबाईल नंबर इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी येथील त्यांच्याच कंपनीत काम करणारा कामगार स्वप्निल सुरेश लोखंडे यांच्या लहानभावाचा असल्याचे समजले. मात्र, सर्व चॅटिंग स्वप्निल यानेच केल्याचे समजले. त्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशिल लोंढे करत आहेत. काल इंदापूर न्यायालयासमोर आरोपीस हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाले आहे. 

Web Title: What's app sexual Chatting with doing dp