'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:48 IST2025-07-01T13:47:41+5:302025-07-01T13:48:02+5:30
नऊ मुलांच्या आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल!
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे एका धक्कादायक घटनेत, नऊ मुलांच्या आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी रीना आणि तिचा प्रियकर हनीफ यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तीन वर्षांपासूनचे प्रेमसंबंध आणि हत्येचे कारण
पोलिसांच्या चौकशीतून असे समोर आले आहे की, रीना आणि हनीफ यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रीनाचा पती रतिराम याला त्यांच्या संबंधांबद्दल कळल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. रतिराम हा त्यांच्या प्रेमाच्या आड येत असल्याने, रीना आणि हनीफने त्याला संपवण्याचा कट रचला.
ही घटना २४ जून रोजी कासगंजमधील पटियाली पोलीस स्टेशन हद्दीतील भरगैन गावात घडली. रतिराम पत्नी रीना आणि मुलांसह विटभट्टीवर काम करण्यासाठी येथे आला होता. मृत रतिरामचा भाऊ अरविंद याने पोलिसांना सांगितले की, रीनाचे माहेर भरगैनमध्येच असून तिचा हनीफसोबत अनैतिक संबंध होते. हनीफ विटभट्टीवर ठेकेदारीचे काम करतो. रतिरामला रीना आणि हनीफच्या संबंधांबद्दल कळल्यानंतर त्यांच्यात मारामारी झाली, त्यानंतर रीना आणि हनीफने रतिरामची हत्या केली.
तीन वेळा पळून गेलेली रीना!
रीना आणि रतिरामला एकूण ९ मुले आहेत, त्यापैकी तिघांची लग्ने झाली होती. असे असूनही, रीनाला स्वतःपेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या हनीफच्या प्रेमात पडली होती. चौकशीत रीनाने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी तिचे आणि हनीफचे प्रेमसंबंध सुरू झाले. या तीन वर्षांत ती तीन वेळा हनीफसोबत पळून गेली होती, पण प्रत्येक वेळी आपली चूक मान्य करून आणि पतीला विश्वास देऊन ती परत यायची.
अशी केली हत्येची योजना
रीनाने सांगितले की, पतीच्या विरोधानंतरही ती आणि हनीफ एकमेकांना भेटत राहिले. यामुळे तिचा रतिरामसोबत सतत वाद होत असे. अखेरीस, रतिरामला संपवण्यासाठी हनीफ आणि रीनाने योजना आखली. या योजनेनुसार, १८ जून रोजी भरगैनमध्ये रीना रतिरामला कामाच्या बहाण्याने शेतात घेऊन गेली. तिथे हनीफ आधीच लपून बसला होता. रतिराम शेतात पोहोचताच हनीफने त्याला पकडले.
त्यानंतर दोघांनी मिळून रतिरामला खाली पाडले. हनीफने रतिरामचा गळा दाबला. रतिराम जीव वाचवण्यासाठी धडपडत होता, तेव्हा रीनाने त्याचे हात घट्ट पकडून ठेवले आणि रतिरामचा जीव जाईपर्यंत दोघांनी त्याला सोडले नाही. त्यानंतर, रतिरामची हत्या आत्महत्या भासावी यासाठी दोघांनी त्याचा मृतदेह ट्यूबवेलवर लटकवला.
दरियागंज रेल्वे स्थानकाजवळून अटक
२४ जून रोजी रतिरामचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. रतिरामचा भाऊ अरविंदने रीना आणि हनीफवर हत्येचा आरोप केला. तेव्हापासून पोलीस रीना आणि हनीफच्या शोधात होते. सोमवारी पटियाली कोतवाली पोलिसांनी एसओजी आणि सर्व्हिलन्स टीमच्या मदतीने दोघांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना दरियागंज रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आले आहे. हनीफचा रक्ताने माखलेली टी-शर्ट जप्त करण्यात आला असून, दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.