प्रेमासाठी काय वाट्टेल ते! लग्नासाठी मार्कशीटमध्ये वयाची हेराफेरी, नवरदेवाला आता ३ वर्षं जेलची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:17 IST2026-01-22T13:17:02+5:302026-01-22T13:17:46+5:30

एका तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी चक्क स्वतःची मार्कशीट आणि त्यात आपल्या वयाचा आकडा बदलला.

What can you expect for love! Manipulation of age in mark sheet for marriage, groom now wants 3 years in jail | प्रेमासाठी काय वाट्टेल ते! लग्नासाठी मार्कशीटमध्ये वयाची हेराफेरी, नवरदेवाला आता ३ वर्षं जेलची हवा

AI Generated Image

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं, पण कायद्याशी खेळ केल्यावर काय होतं, याचा प्रत्यय भोपाळमध्ये आला आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी चक्क स्वतःची मार्कशीटच बदलली आणि त्यात आपल्या वयाचा आकडा बदलला. मात्र, लग्नाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. न्यायालयाने या तरुणासह त्याला बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या साथीदाराला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण भोपाळच्या रातीबढ भागातील आहे. लोकेश मेहर नावाच्या तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, कायदेशीररीत्या लग्नासाठी लागणारे त्याचे वय नव्हते. प्रेयसीशी लग्न करण्याच्या हट्टापोटी लोकेशने स्वतःला सज्ञान दाखवण्यासाठी बनावट मार्कशीट तयार करण्याचा घाट घातला. या कामात त्याला बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या उम्मेद राठोड याने साथ दिली.

असा उघड झाला बनावट लग्नाचा बनाव

२३ नोव्हेंबर २०२० रोजी अर्जुन सिंह नावाच्या व्यक्तीने आपली मुलगी पायली बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दुसऱ्याच दिवशी पायल आणि लोकेश यांनी एका मंदिरात लग्न केल्याचे समोर आले. दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले, मात्र जेव्हा त्यांच्या लग्नाचे कागदपत्र तपासण्यात आले, तेव्हा पोलिसांना संशय आला.

वयाच्या खेळात अडकला नवरदेव

लोकेशने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्याची जन्मतारीख १ फेब्रुवारी १९९८ अशी नोंदवण्यात आली होती. पण जेव्हा पोलिसांनी शाळेचे रेकॉर्ड तपासले, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. सरकारी शाळेच्या मूळ मार्कशीटनुसार त्याची खरी जन्मतारीख १ फेब्रुवारी २००१ होती. म्हणजे लग्नाच्या वेळी तो कायदेशीररीत्या वयाची अट पूर्ण करत नव्हता.

अस्तित्वात नसलेली शाळा आणि बनावट मार्कशीट

पोलिसांनी लोकेशच्या घराची झडती घेतली असता, तिथे 'जनक मेमोरियल स्कूल' नावाची मार्कशीट सापडली. तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली की, अशा नावाची कोणतीही शाळा अस्तित्वातच नाही! लोकेशची चौकशी केली असता त्याने उम्मेद राठोडचे नाव घेतले. उम्मेद हा एका खाजगी शाळेत शिक्षक होता आणि उत्तर प्रदेशातून भोपाळमध्ये येऊन बनावट मार्कशीट बनवण्याचे रॅकेट चालवत होता.

कोर्टाने दिला दणका

जिल्हा शिक्षण अधिकारी आणि फॉरेन्सिक तपासात ही मार्कशीट पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक बन्सल यांनी सर्व पुरावे ग्राह्य धरत लोकेश मेहर आणि उम्मेद राठोड या दोघांनाही दोषी ठरवले. "प्रेम आपल्या जागी आहे, पण कायद्याशी खेळणाऱ्यांना शिक्षा अटळ आहे," असे नमूद करत न्यायालयाने दोघांनाही ३ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड सुनावला.

Web Title : प्यार में धोखा: शादी के लिए मार्कशीट बदली, दूल्हे को तीन साल की जेल।

Web Summary : भोपाल में एक आदमी ने अपनी प्रेमिका से शादी करने के लिए मार्कशीट बदली। जाली दस्तावेज मिलने पर अदालत ने उसे और उसके साथी को तीन साल की जेल की सजा सुनाई। प्यार, पर कानून से ऊपर नहीं।

Web Title : Love Knows No Law: Man Jailed for Forging Marksheet for Marriage.

Web Summary : In Bhopal, a man altered his mark sheet to marry his sweetheart. The court sentenced him and his accomplice to three years in prison for forgery after discovering the fake documents. Love, but not above the law.