शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

पूर्ववैमनस्यातून झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 5:42 PM

भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. 

पुणे : दोन भावांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी शेजारी राहणाऱ्याचे वडील गेले़. त्यांना तरुणाने शिवीगाळ केली़. त्यातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी ऋषभ रवींद्र नेटके (वय २४, रा़ भवानी पेठ) याला अटक केली आहे. याप्रकरणी अदिब बागवान (वय २७, रा़ भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अदिब बागवान व त्यांचा मोठा भाऊ यांच्यामध्ये भांडणे चालली होती. त्यावेळी ऋषभ यांचे वडिले हे भांडणे सोडविण्यासाठी गेले होते. त्यावेळी अदिब याने त्यांना शिवीगाळ केली होती. याबाबत रवींद्र नेटके यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हा अदिबने त्यांना मारहाण केली होती. याचा राग ऋषभ यांना होता. अदिब हा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोरील रोडवर पार्क केलेल्या मोकळ्या हौद्यात दारु पिऊन झोपले होते. त्यावेळी ऋषभ व त्याच्या एका साथीदाराने कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने डोक्यावर, मानेवर, पायावर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले़ खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस