पूर्ववैमनस्यातून झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 17:43 IST2019-12-28T17:42:39+5:302019-12-28T17:43:49+5:30

भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. 

The weopan attack on the sleeping young man from former issue | पूर्ववैमनस्यातून झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार

पूर्ववैमनस्यातून झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार

पुणे : दोन भावांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी शेजारी राहणाऱ्याचे वडील गेले़. त्यांना तरुणाने शिवीगाळ केली़. त्यातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. 
याप्रकरणी खडक पोलिसांनी ऋषभ रवींद्र नेटके (वय २४, रा़ भवानी पेठ) याला अटक केली आहे. याप्रकरणी अदिब बागवान (वय २७, रा़ भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अदिब बागवान व त्यांचा मोठा भाऊ यांच्यामध्ये भांडणे चालली होती. त्यावेळी ऋषभ यांचे वडिले हे भांडणे सोडविण्यासाठी गेले होते. त्यावेळी अदिब याने त्यांना शिवीगाळ केली होती. याबाबत रवींद्र नेटके यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हा अदिबने त्यांना मारहाण केली होती. याचा राग ऋषभ यांना होता. अदिब हा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोरील रोडवर पार्क केलेल्या मोकळ्या हौद्यात दारु पिऊन झोपले होते. त्यावेळी ऋषभ व त्याच्या एका साथीदाराने कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने डोक्यावर, मानेवर, पायावर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले़ खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: The weopan attack on the sleeping young man from former issue