वाकड येथे अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 19:48 IST2019-06-19T19:46:29+5:302019-06-19T19:48:32+5:30

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन एकाने वृद्धावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला.

weopan attack on person due to toilet on body at wakad | वाकड येथे अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

वाकड येथे अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

हिंजवडी : अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन एकाने वृद्धावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथे मंगळवारी (दि. १८) ही घटना घडली. खुनाचा प्रयत्न म्हणून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी उर्फ विकास अडागळे (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी किरण शिवमूर्ती जाकते (वय ५८, सुदर्शन कॉलनी लेन १, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. 
फियार्दी किरण जाकते यांचे वडील घराजवळील दुकानासमोर झोपले होते. त्यावेळी आरोपी विकास अडागळे याने त्यांच्या अंगावर लघुशंका केली. फियार्दी जाकते यांच्या वडिलांनी याचा जाब विचारला. त्यामुळे आरोपी अडागळे याला राग आला. थांब तुला आता ठारच मारतो, अशी धमकी देत आरोपी अडागळे याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवत त्यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पाठीत मुक्कामार देऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.


 

Web Title: weopan attack on person due to toilet on body at wakad