शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:20 IST

तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे.

तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणा अँटी-करप्शन ब्युरोने (ACB) २ एप्रिल रोजी वारंगल (ग्रामीण) सब-रजिस्ट्रार कार्यालयावर अचानक छापा टाकला. या कारवाईत अवैध व्यवहार, विनानोंदणीची कागदपत्रं आणि अनधिकृत एजंटचा वावर उघड झाला आहे. वारंगल रेंजच्या एसीबी अधिकाऱ्यांनी हनुमकोंडा जिल्ह्यातील या कार्यालयात ही कारवाई केली. या छाप्यानंतर दोन अधिकाऱ्यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली, जिथे कोट्यवधी रुपयांचं सोनं-चांदी आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

एसीबीच्या तपासणीदरम्यान कार्यालय परिसरात २० अनधिकृत एजंट आणि क्लार्क काम करताना आढळले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ४७,४५० रुपये रोख आणि ७० कागदपत्रं जप्त केली आहेत. यामुळे जमीन आणि मालमत्तेच्या व्यवहारांत गंभीर गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

WhatsApp चॅटने वाढवल्या अडचणी

तपास पथकाने क्लार्कचे मोबाईल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. एसीबीच्या म्हणण्यानुसार, सब-रजिस्ट्रार अधिकारी-I जमालापुरम रामचंद्र राव आणि सब-रजिस्ट्रार अधिकारी-II दावुलुरी आनंद यांच्यातील व्हॉट्सएप चॅट उघड झाले आहेत. या चॅट्समध्ये गेल्या एका वर्षात फोन-पे (PhonePe) द्वारे सुमारे ४२.०३ लाख रुपयांच्या व्यवहारांचा उल्लेख आहे. 

अधिकाऱ्यांच्या घरात सोन्या-चांदीचं घबाड

कार्यालयानंतर एसीबीने दोन्ही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी एकाच वेळी झडती सत्र राबवलं. यावेळी २४.६१ लाख रुपये रोख, ८१९.५ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे १.२३ कोटी रुपये) आणि २.६ किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, सब-रजिस्ट्रार दावुलुरी आनंदच्या घरातून 'कपिल चिट्स'मधील ३०.१० लाख रुपयांच्या मुदत ठेवींची (FD) कागदपत्रंही सापडली आहेत. एसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून तो पुढील कारवाईसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana Office Raid Uncovers Crores in Gold, Cash; Officials Busted

Web Summary : A raid on a Telangana sub-registrar office revealed widespread corruption. Authorities seized gold worth over ₹1 crore, ₹25 lakh in cash, and incriminating documents. WhatsApp chats exposed illegal transactions. Two officials are under investigation for amassing illicit wealth.
टॅग्स :TelanganaतेलंगणाraidधाडMONEYपैसाGoldसोनं