विजय सिंह मृत्यू प्रकरणी ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 15:19 IST2019-10-29T15:17:26+5:302019-10-29T15:19:16+5:30

५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे. 

Vijay Singh custodial death case: 5 Police officers suspended | विजय सिंह मृत्यू प्रकरणी ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

विजय सिंह मृत्यू प्रकरणी ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

ठळक मुद्देवडाळा टी. टी. पोलीस ठाणे परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीविजय सिंह (२६) असं या तरुणाचं नाव असून ही घटना २७ ऑक्टोबरला उशिरा रात्री घडली होती.

मुंबई -  वडाळा टी. टी. पोलीस ठाणे परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजय सिंह (२६) असं या तरुणाचं नाव असून ही घटना २७ ऑक्टोबरला उशिरा रात्री घडली होती. या तरुणाच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने वडाळा पोलीस ठाण्याच्या ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे. 

२७ ऑक्टोबरला रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास वडाळा टी. टी. पोलिसांची मोबाईल व्हॅन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर असतान एमएमआरडीए कंपाउंड या ठिकाणी काहीजण आपसात वाद घालत असताना आढळून आले. त्यावेळी त्यांना पुढील कारवाईसाठो वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात येण्यात आले. त्यावर तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीवरून भा. दं. वि. कलम ३२३, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान तक्रार दाखल करत असताना विरोधक इसम असलेल्या विजयसिंह हृदयनारायण सिंह (२६) याच्या छातीत अचानक दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखलपुर्व मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Vijay Singh custodial death case: 5 Police officers suspended