शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

थरारक Video! हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; मैत्रिणीसोबत तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 12:32 IST

Traffic police, Crime News in Nagpur: दुचाकीला उडविले. वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर  : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांना कारच्या बॉनेटवर बसवून दुचाकींना धडक मारत समोर जाणारा आरोपी आकाश चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी देशमुख या दोघांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे.

रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सक्करदरा चौक ते राजे रघुजी मार्गावर हे थरारनाट्य घडले होते. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून पुढे जात असलेल्या आरोपी चव्हाणची कार हवालदार अमोल यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. तो थांबत नसल्याचे पाहून हवालदार अमोल कारसमोर उभे झाले.  चव्हाणने त्यांना न जुमानता तशाच अवस्थेत कार दामटली. हवालदार अमोलही बोनट वर चढले. त्या अवस्थेत सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत चव्हाणने आपली कार दामटवत काही दुचाकींना धडक मारली.

पहा व्हिडीओ....

वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली. नंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी आहे.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीcarकार