Video: सोबत गर्लफ्रेंड, भरधाव कार; बारावीच्या विद्यार्थ्याने 6 जणांना चिरडले, एका चिमुकल्याचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:37 IST2026-02-13T13:33:56+5:302026-02-13T13:37:26+5:30

गर्लफ्रेंडसोबत कारने निघालेल्या १२वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने ६ जणांना चिरडल्याची घटना घडली. यात एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. 

Video: Speeding car with girlfriend; Class 12 student crushes 6 people, kills a toddler | Video: सोबत गर्लफ्रेंड, भरधाव कार; बारावीच्या विद्यार्थ्याने 6 जणांना चिरडले, एका चिमुकल्याचा घेतला जीव

Video: सोबत गर्लफ्रेंड, भरधाव कार; बारावीच्या विद्यार्थ्याने 6 जणांना चिरडले, एका चिमुकल्याचा घेतला जीव

एक सीसीटीव्ही व्हिडीओ जो बघून तुमचाही थरकाप होईल. प्रति तास १०० किमी इतक्या वेगाने कार चालवत निघालेल्या एका विद्यार्थ्याने ६ जणांना चिरडले. यात एका ६ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. लखनौमधील सरोजीनगरमध्ये गुरूवारी रात्री ही हिट अँड रनची घटना घडली. चौकात लोकांची गर्दी असतानाही कार चालवत असलेल्या मुलाने वेग कमी केला नाही.    

बारावीत शिकत असलेला हा विद्यार्थी गर्लफ्रेंडसोबत जात होता. बारावीचा निरोप समारंभ पार पडल्यानंतर कारने जात असतानाच ही घटना घडली. गौरव सिंह असे पोलिसांनी अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. 

कारने सहा जणांना उडवले, घटनेचा सीसीटीव्ही 

पोलिसांनी सांगितले की, गौरव सिंह हा खूप वेगाने कार चालवत होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंडही होती. चौकात गर्दी असतानाही त्याने वेग कमी केला नाही. सहा जणांना उडवत तो पुढे निघून गेला. यात ६ वर्षाच्या दीक्षांतचा मृत्यू झाला. 

आजीसोबत बाजारात आला आणि जीव गेला

अपघातात मृत्यू झालेला दीक्षांत आजीसोबत बाजारात आला होता. दीक्षांत हा मूळचा उन्नावचा आहे. तो आईसोबत राहत होता आणि केंद्रीय विद्यालयात शिकत होता. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता कानपूर रोडवरील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. 

सहा जणांना उडवल्यानंतर गौरव सिंहने कार थांबवली. त्यातून त्याची गर्लफ्रेंड उतरली आणि पळून गेली. त्यानंतर गौरव कार घेऊन फरार झाला. पण, पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अटक केली. 

सहा जणांना कसे उडवले?

हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला प्रमोद कुमार हे दुचाकी उभी करून त्यावर बसलेले होते. तेव्हा गौरव सिंहने त्यांना उडवले. लोक त्याला पकडण्यासाठी धावले आणि त्यानंतर त्याने आणखी वेग वाढवला. पुढे त्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या १२ वर्षाच्या अरमानला उडवले. 

पुढे गेल्यानंतर संजय पटेल यांची पत्नी साधना, त्यांची आई मीना देवी आणि मुलगा दीक्षांत यांना उडवले. एका रिक्षा चालकालाही त्याने धडक दिली. त्यानंतर तो गर्लफ्रेंडला उतरवून पुढे निघून गेला. 

Web Title : गर्लफ्रेंड के साथ गाड़ी चलाते छात्र ने छह को कुचला, बच्चे की मौत

Web Summary : लखनऊ में गर्लफ्रेंड के साथ 100 किमी प्रति घंटे की रफ्तार से गाड़ी चलाते हुए एक छात्र ने छह लोगों को कुचल दिया, जिसमें एक 6 वर्षीय बच्चे की मौत हो गई। गौरव सिंह नामक छात्र को गिरफ्तार कर लिया गया। हादसा हनुमान मंदिर के पास हुआ।

Web Title : Student Hits Six, Kills Child While Driving with Girlfriend

Web Summary : A student driving with his girlfriend at 100 kmph in Lucknow hit six people, killing a 6-year-old. The student, identified as Gaurav Singh, was arrested after fleeing the scene. The tragic incident occurred near a Hanuman temple.