वडिलांच्या फोनवर मुलीच्या गँगरेपचा व्हिडिओ आला, 2 आरोपींना अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:27 IST2022-06-29T21:26:58+5:302022-06-29T21:27:45+5:30
Gangrape Case : याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वडिलांच्या फोनवर मुलीच्या गँगरेपचा व्हिडिओ आला, 2 आरोपींना अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मथुरा येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून पीडितेच्या वडिलांनी जैत पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची मुले घरी एकटीच राहतात. वडील ड्रायव्हर आहे. त्यामुळे ते अनेक दिवस घराबाहेर असतात. दोन दिवसांपूर्वी दुसऱ्या राज्यातून परतल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला होता. हा त्यांच्या मुलीसोबतचा बलात्काराचा व्हिडिओ होता, जो पाहून त्यांना धक्का बसला.
घाबरलेल्या मुलीने वडिलांना सगळा प्रकार सांगितला
घटनेबाबत विचारणा केली असता पीडितेने भयभीत होऊन सांगितले की, 10 जून रोजी दुपारी 2 वाजता गावातील चार जणांनी तिला इंधन आणण्याच्या बहाण्याने सोबत नेले आणि घाबरवून दूरवर असलेल्या घरात नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, एका आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. ४ दिवसांपूर्वी आरोपी पुन्हा तिला सोबत घेण्यासाठी आला असता तिने नकार दिला. यानंतर आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. सीओ प्रवीण मलिक यांनी मंगळवारी रात्री पीडित मुलीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.
सीओ प्रवीण मलिक यांनी सांगितले की, पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तिच्या वडिलांनी तक्रार केली की, तिच्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही बाब निदर्शनास येताच वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या घटनेत सहभागी असलेले सर्व आरोपी पकडले जातील.