शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Video : अपघात निघाला सुपारी किलिंग; पाच वर्षांपूर्वीचा हत्येच्या गुन्हा झाला उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 9:23 PM

उत्तर प्रदेशातील सरपंचाने घडवली हत्या

ठळक मुद्दे2014 साली वडाळा टी. टी. पोलिसांच्या हद्दीतील चेंबूर येथील वडाळा लिंक रोड परिसरात सायकलवरून जाणाऱ्या इकबाल बरकर खान (40) यांना अनोळखी टँकरने धडक दिली होती.उत्तर प्रदेशातील गावच्या सरपंचानेच त्याच्या व्यावसायिक भागिदाराची हत्या घडवून आणल्याचे उघड झाले.कुरेशी व टॅंकर चालक अमोल यांना अटक केली असून तिसरा आरोपीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशाला रवाना झाले आहेत.

मुंबई - 5 वर्षांपूर्वी चेंबूर येथे दुचाकीस्वाराचा अपघातात झालेला मृत्यू हा अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचे पोलीस तपासात उघड  झाले. सुपारीचे पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे आरोपीने दारूच्या नशेत खबऱ्याकडे सर्व बडबडला. त्यामुळे उत्तर प्रदेशातील गावच्या सरपंचानेच त्याच्या व्यावसायिक भागिदाराची हत्या घडवून आणल्याचे उघड झाले.

2014 साली वडाळा टी. टी. पोलिसांच्या हद्दीतील चेंबूर येथील वडाळा लिंक रोड परिसरात सायकलवरून जाणाऱ्या इकबाल बरकर खान (40) यांना अनोळखी टँकरने धडक दिली होती. त्याप्रकरणी अनोळखी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी न सापडल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अ वर्गीकरण केले होते. पण या टॅंकर चालकाला अमोल तात्यासो पटोबा (36) याला या सुपारी किंलिंगचे ठरलेले 30 हजार मिळाले नसल्यामुळे दारूच्या नशेत त्याने या हत्येबाबत बाळगलेली गुप्तता उलगडले. ती माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 3 च्या पोलिसांपर्यंत पोहोचल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत पोपटासारखा बोलल्यामुळे त्याचा मालक सैफुद्दीने कुरेशी (45) याचाही हत्येतील सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी त्याने खान याचा व्यावसायिक भागीदाराने खानला मारण्यासाठी 40 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा तपास उत्तर प्रदेशातील एका गावचा सरपंच व खानचा व्यावसायिक भागिदारापर्यंत पोलिसांचा तपास पोहोचला. खानमुळे त्याचा यापूर्वी निवडणूकीत पराभव झाला होता. तसेच खानला त्याला 10 लाख रुपये देणे बाकी होते. त्यामुळे त्याने खानचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी कुरेशी व टॅंकर चालक अमोल यांना अटक केली असून तिसरा आरोपीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशाला रवाना झाले आहेत. 

 

 

टॅग्स :MurderखूनAccidentअपघातPoliceपोलिसArrestअटक