Video: दिवसाढवळ्या कार अडवली, दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर 'बॅग' पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 16:22 IST2023-06-26T16:17:07+5:302023-06-26T16:22:55+5:30
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Video: दिवसाढवळ्या कार अडवली, दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर 'बॅग' पळवली
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी दिवसाढवळ्या बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर, याप्रकरणातील आरोपी अतिक अहमद व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. मात्र, रुग्णालयातून नेताना त्यांची मीडियासमोरच हत्या करण्यात आली होती. या घटनांवरुन काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युपीतील योगी सरकावर निशाणा साधला. तर, गुन्हेगारी वाढत असल्यावरुन मोदी सरकावरही सातत्याने टीका केली जात आहे. काँग्रेसने आता राजधानी दिल्लीत दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्याच्या घटनेवरुन गृहमंत्री अमित शहांना सवाल केलाय.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिवसाढवळ्या राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानच्या टनेलमध्ये घुसून एका कारची लूट करण्यात आल्याचे दिसून येते. दोन बाईकवरुन ४ जण एका चारचाकी गाडीला अडवतात. त्यानंतर, बंदुकीचा धाक दाखवून गाडीतील प्रवाशांकडून एक बॅग लूटत असल्याचे सीसीटीव्हीच्या व्हिडिओत दिसत आहे. बाईकस्वारांनी हेल्मेट घातल्याचेही व्हिडिओत दिसून येते.
.@AmitShah जी, ये वीडियो देखिए।
— Congress (@INCIndia) June 26, 2023
दिल्ली के प्रगति मैदान टनल में दिन दहाड़े कुछ बाइक सवार आते हैं। कार रोकते हैं और कार सवार से 2 लाख रुपए लूट ले जाते हैं।
देश की राजधानी में ये हो रहा है। देख रहे हैं ना आप? pic.twitter.com/WEX5yvxJH2
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना मेन्शन करुन प्रश्न विचारला आहे. हे काय चाललंय, तुम्ही पाहताय ना? असा सवाल अमित शहांना विचारण्यात आलाय. दरम्यान, दरोडेखोरांनी या कारमधील प्रवाशांकडून २ लाख रुपये लुटल्याचेही काँग्रेसने ट्विटमध्ये सांगितलंय.