Video : भाजपा नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:40 IST2021-05-15T20:39:37+5:302021-05-15T20:40:24+5:30
BJP corporator's husband vandalizes hospital : घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Video : भाजपा नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केली तोडफोड
नाशिक- नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याचे वृत्त असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.पोलिसांनी रुग्णालय बंद केले असून सध्या नागरिकांची बाहेर गर्दी झाली आहे.
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत मात्र रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार मध्ये नेली आणि तोडफोड केली असे सांगितले जात आहे. अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात तोडफोड pic.twitter.com/2pnXYTdywS
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2021
नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात तोडफोड pic.twitter.com/eQ1CawlqRj
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2021