Video : पाणीपुरीच्या पाण्यात लघवी मिसळणाऱ्यास अटक; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:42 PM2021-08-22T21:42:18+5:302021-08-22T21:45:02+5:30

A street vendor(pani puri saller) has been arrestd : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाणीपुरी विक्रेत्यास अटक केली आहे. 

Video: Arrested for urinating in Panipuri water; Action after video goes viral | Video : पाणीपुरीच्या पाण्यात लघवी मिसळणाऱ्यास अटक; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई 

Video : पाणीपुरीच्या पाण्यात लघवी मिसळणाऱ्यास अटक; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई 

Next
ठळक मुद्देया विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगाव भागातला आहे.

 

२०११ साली ठाण्यातील नौपाडा येथील ५९ वर्षीय पाणीपुरी विक्रेता होता त्याने केलेल्या कृत्याची गुवाहाटीत पुनरावृत्ती घडली आहे. हॉटेलपेक्षा लोकांना ठेल्यावर, रस्त्यावरील स्टॉल्सवर जाऊन पाणीपुरी खाणं पसंत करतात. अशातच एका पाणीपुरी स्टॉल्सवरचा एक भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून पाणी पुरी खवय्ये पुन्हा पाणी पुरी खायला जाताना नक्की विचार करतील. एका पाणी पुरी विक्रेत्याने पाणी पुरीच्या पाण्यामध्ये लघवी टाकल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्स देखील संतापले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाणीपुरी विक्रेत्यास अटक केली आहे. 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये, हे स्पष्टपणे दिसत आहे की पाणीपुरी विकणारा व्यक्ती अंगावरच्या कपड्याखालून एका मगमध्ये लघवी करतो आणि नंतर त्याच मागतील पाणी वापरून लोकांना पाणी पुरी देतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगाव भागातला आहे. ट्विटर युझर मामून खान यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. १० सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत अनेक हजार लोकांनी बघितला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. अनेकजण कमेंट्स सेक्शनमध्ये आपला संताप व्यक्त करत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली जात आहे.

Web Title: Video: Arrested for urinating in Panipuri water; Action after video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.