Video : आमिर खानच्या मुलींने केला धक्कादायक खुलासा, १४ वर्षाची असताना झाले होते लैंगिक शोषण
By पूनम अपराज | Updated: November 2, 2020 19:50 IST2020-11-02T19:48:30+5:302020-11-02T19:50:28+5:30
Aamir Khan Daughter's Video : नुकताच इराने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती उदास का आहे हे आपल्याला कधीच समजले नाही. इराने असेही सांगितले की, आई-वडिलांचा घटस्फोट देखील तिच्या उदासपणाचे कारण राहिलेलं नाही.

Video : आमिर खानच्या मुलींने केला धक्कादायक खुलासा, १४ वर्षाची असताना झाले होते लैंगिक शोषण
जागतिक मनोरुग्ण दिनी आपल्या डिप्रेशनला उद्देशून बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा खानने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर ती चर्चेत आहे. त्या व्हिडिओमध्ये इरा खानने म्हटले होते की 'मी डिप्रेशनमध्ये आहे', त्यानंतर सोशल मीडियावर इरा खान बरीच चर्चेत आली. पुन्हा एकदा इरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नुकताच इराने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती उदास का आहे हे आपल्याला कधीच समजले नाही. इराने असेही सांगितले की, आई-वडिलांचा घटस्फोट देखील तिच्या उदासपणाचे कारण राहिलेलं नाही.
ती असं पण म्हणत आहे, ती नैराश्यात का आहे हे उत्तर देऊ शकणार नाही, कारण ती स्वतः कारण जाणत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ती हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु कोणतेही प्रत्यक्ष आणि योग्य उत्तर सापडले नाही. ती म्हणाली, 'आज मी तुम्हाला माझ्या आरामदायी जीवनाबद्दल सांगू इच्छित आहे. पैशाबाबत मला कधीच समस्या वाटली नाही. माझे पालक, माझे मित्र, त्यांनी मला कधीही कोणत्याही गोष्टीचा दबाव आणला नाही.
पालकांच्या घटस्फोटावर खुलासा
व्हिडिओमध्ये इरा खानने तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, "मी लहान असताना माझ्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता, परंतु मला याबद्दल धक्का बसला नव्हता. माझ्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतरही ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत, विखुरलेले कुटुंब नाही आहे. मी ६ वर्षांची होते, तेव्हा मला टीबी झाला होता. त्यामुळे टीबी माझ्यासाठी इतकी वाईट गोष्ट नव्हती की ज्यामुळे मी दुखी आहे.
वयाच्या १४व्या वर्षी लैंगिक अत्याचार
मी 14 वर्षांचा असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळी काय घडत आहे हे मला माहित नव्हते, परंतु जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले. होय, मला असं वाटलं की, माझ्याबरोबर असं का होऊ दिलं, पण मी आयुष्यातला हा इतका मोठा धक्का मानला नव्हता की मी नैराश्यात जाईन. मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माझ्या मित्रांना आणि पालकांना सांगू शकते, परंतु काय सांगावे. ते मला काय विचारणार? तर मी काय सांगू. माझ्यासोबत काही वाईट घडलेच नाही असं मी अनुभवत आहे. या विचारसरणीने मला त्यांच्याशी बोलण्यास थांबवले आहे आणि दूर ठेवले आहे."
आमिर खानची मुलगी इरा खान बर्याचदा गंभीर मुद्द्यांविषयी बोलते. यावेळी इराने आपल्या नैराश्याचे कारण स्पष्ट करण्यासाठी मुक्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.