शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 23:57 IST

शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार केल्याप्रकरणात कोथरूड पोलिसांनी सुशील राजेंद्र हगवणे याला अटक केली होती. मात्र, गुन्ह्यात जामीनपात्र कलमे लावल्याने त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. लगेचच न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर देखील केला होता. याला काही तास होत नाही तोच पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहातून शशांक हगवणे व निलेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे. 

वारजे माळवाडी पोलिसांनी रात्री उशिरा शशांक हगवणे व निलेश चव्हाणचा ताबा घेतला आहे.  शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांचाही ताबा घेण्यात आला आहे. पुणे पोलिस उद्या दुपारी या दोघांना देखील न्यायालयासमोर हजर करणार आहेत. 

सुशील राजेंद्र हगवणे प्रकरणात काय झाले...पोलीस हवालदार मंगेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे पल्लवी काशिद यांनी न्यायालयात बाजू मांडली. २९ जुलै २०२२ ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तो आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांचा दीर आहे. त्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना न्यायालयाच्या परवानगीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हगवणे याच्यावर कलम भारतीय दंड संहिता 177, 191, 192, 193, 417, 419 व शस्त्रास्त्र प्रतिबंध कायदा कलम 30, नियम 11 (8) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही कलमे जामीनपात्र आहेत, तरीही तपास अधिका-यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला आरोपीचे वकील अँड. स्वानंद गोविंदवार यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर आरोपीला जामीन मंजूर केला.

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणे