"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:45 IST2025-10-07T11:45:01+5:302025-10-07T11:45:39+5:30
गेल्या वर्षी एसटीएफने छांगुरच्या कारवायांची चौकशी करून पुरावे गोळा केले होते. यानंतर छांगुर, त्याचा मुलगा महबूब, नवीन रोहरा, त्याची पत्नी नीतू उर्फ परवीन, सबरोज, सहाबुद्दीन आणि राजेश उपाध्याय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
लखनऊ : अवैध धर्मांतरण प्रकरणात एटीएसने जलालुद्दीन उर्फ छांगूर, त्याची जवळची साथीदार नीतू उर्फ परवीन यांच्यासह सहा जणांविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. छांगुर लखनऊपासून मुंबईपर्यंत धर्मांतरणाचे जाळे चालवत होता. परदेशी फंडिंगच्या माध्यमाने नीतू आणि तिचा पती नवीन रोहरा यांच्या खात्यांत कोट्यवधी रुपये जमा झाले होते, असे तपासात समोर आले आहे. चार्जशीटमध्ये बलरामपूर न्यायालयात कार्यरत राजेश उपाध्याय यांच्या नावाचाही समावेश आहे.
गेल्या वर्षी एसटीएफने छांगुरच्या कारवायांची चौकशी करून पुरावे गोळा केले होते. यानंतर छांगुर, त्याचा मुलगा महबूब, नवीन रोहरा, त्याची पत्नी नीतू उर्फ परवीन, सबरोज, सहाबुद्दीन आणि राजेश उपाध्याय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ईडीने छांगुर, नीतू आणि नवीन यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.तसेच, इतर काही आरोपींविरुद्ध लवकरच चार्जशीट दाखल होणार असून तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
धर्मांतरणाच्या या रॅकेटमुळे देशभरात खळबळ उडाली होती. छांगुर टोळीने सुमारे 300 कोटी रुपयांची संपत्ती उभी केली असल्याचे समोर आले आहे. या टोळीसोबत तीन हजारांहून जास्त लोक जोडले गेले आहेत. यांपैकी मुख्य ४०० जण गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीसोबत काम करत आहेत.
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान, दुबई, कॅनडा, नेपाळ आणि सौदी अरेबियातून या टोळीला फंडिंग मिळत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची शासनानेही गंभीर दखल घेतली होती आणि दररोज तपास संस्थांकडून तपासाचा अहवाल मागवला जात होता. महत्वाचे म्हणजे, शासनाने बलरामपूर पोलीस आणि प्रशासनासोबतच एटीएस आणि एसटीएफलाही तपास अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते.