संतापजनक! अल्पवयीन मुलगी एकट्यात पाहून अत्याचार करायचे मामा, भाऊ; विरोध केलं की, मारायचे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 22:49 IST2023-01-16T22:48:03+5:302023-01-16T22:49:27+5:30
मोहनलालगंज पोलिसांनीही पीडितेवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला आटक केली आहे.

संतापजनक! अल्पवयीन मुलगी एकट्यात पाहून अत्याचार करायचे मामा, भाऊ; विरोध केलं की, मारायचे अन्...
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील चिनहट पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी चुलत भाऊ आणि मामाला अटक केली आहे. आरोपी गेल्या सहा मिहिन्यांपासून संबंधित मुलगी एकटी असलेल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करायचे. याला विरोध केल्यानंतर ते तिला मारहाणही करत. तसेच, मोहनलालगंज पोलिसांनीही पीडितेवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला आटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी 17 वर्षीय पीडितेने गुन्हा नोंदवला आहे, की बाराबंकी येथील चुलत मामा आणि चुलत भाऊ नेहमी घरी ये-जा करत असतात. घरी एकटं पाहून अत्याचार करतात. विरोध केल्यास मारहाण करतात. गेल्या सहा मिहिन्यांपासून आरोपी असे करत आहेत. एवढेच नाही, तर कुणाकडे तक्रार केल्यास जीवे मारू, अशी धमकीही ते देत होते. भीतीमुळे अद्यापपर्यंत तक्रार देण्याची हिंमत होत नव्हती.
पोलीस निरीक्षक अनिल कुमार पाण्डेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि पंकज या दोन्ही आरोपिंना फैजाबाद रोडवरून अटक करण्यात आली होती. तसेच, मोहनलालगंज पोलिसांनीही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपित मोहनलालगंजमधील मजरा गौरा येथील रहिवासी सोहनलालला (19) अटक करण्यात आली आहे. संबंधित पीडितेच्या वडिलांनी गेल्या 9 जानेवारीला गुन्हा दाखल केला होता की, त्यांची 12 वर्षीय मुलगी आपल्या दुसऱ्या घरात गेली होती. तेथे तिला एकटीला पाहून आरोपी सोहनलालने तिच्यावर अत्याचार केला आणि धमकावत निघून गेला.