UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:32 IST2025-10-28T18:31:20+5:302025-10-28T18:32:58+5:30
Delhi UPSC Student Amrita Chauhan: ६ ऑक्टोबर २०२५ रोजी यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला होता. सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू झाल्याचे हे प्रकरण वाटत होते, पण तपासानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. फॉरेन्सिक सायन्सचे शिक्षण घेत असलेल्या त्याच्याच गर्लफ्रेंडने ही हत्या केली.

UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
Amrita Chauhan News: दिल्लीतील गांधी विहार परिसरात असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून अचानक धूर येऊ लागला. आग लागली म्हणून पोलीस आणि अग्निशामक दलाला बोलवले गेले. चौथ्या मजल्यावर पोलीस पोहोचले तेव्हा जळलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. पोलिसांना आग लागून मृत्यू झाल्याचे वाटले. आग लागूनच यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला, असे पोलिसांना वाटावे म्हणून तसाच कट अमृताने रचला होता. पण, जेव्हा पोलिसांनी बारकाईने याचा तपास केला, तेव्हा ही हत्या असल्याचे समोर आले. गुन्ह्यांची उकल करणाऱ्या फॉरेन्सिक सायन्सचे शिक्षण घेत असलेल्या अमृताने पुरावा शिल्लक राहणार नाही याची पुरेपर काळजी घेतली, मात्र तिच्याकडूनही एक चूक झालीच आणि त्यामुळे हत्येचे बिंग फुटले.
यूपीएससी परीक्षेची तयारी करणारा ३२ वर्षीय रामकेश मीना आणि अमृता चौहान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. रामकेश मीनाची अमृताने थंड डोक्याने आणि हत्या केल्याचे पुरावे मिळू नये म्हणून नियोजन करून हत्या केली. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. गांधी विहार इमारतीतील चौथ्या मजल्यावर ही घटना घडली होती.
अमृताने थंड डोक्याने रचला कट, पुरावेही ठेवले नाही; पण...
रामकेश मीना ज्या फ्लॅटमध्ये राहत होता. तेथील सामान घटनेवेळी अस्ताव्यस्त पडलेलं होतं. तिथेच पोलिसांना हा अपघात असण्यापेक्षा घातपात असल्याचा संशय आला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
सगळ्यात आधी पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तिथेच पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला. ५ ऑक्टोबरच्या रात्री दोन तरुण चेहरे झाकून इमारतीमध्ये घुसले होते. आधी एक तरुणच बाहेर पडला. त्यानंतर रात्री २.५७ वाजता एक तरुणी इमारतीतून बाहेर पडली. तिच्यासोबत एक तरुणही होता. ती अमृता चौहान होती. २१ वर्षीय अमृता न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विषयाचे शिक्षण घेत आहे.
मोबाईल लोकेशनमुळे फसली
अमृता एक साथीदारासोबत बाहेर पडली होती. त्यानंतर काही वेळाने रामकेश मीनाच्या फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला. पोलिसांनी इमारतीतून बाहेर पडलेली तरुणी अमृताच होती का, याची खात्री करण्यासाठी तिच्या मोबाईलचे त्यावेळचे लोकेशन तपासले. अमृताच रात्री बाहेर पडली होती. पोलिसांना आणखी सबळ पुरावा मिळाला.
अमृताने एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने केली हत्या
पोलिसांनी २१ वर्षीय अमृता चौहानला अटक केली. तिची चौकशी केली. त्यावेळी तिने रामकेश मीनाची हत्या केल्याची कबूली दिली. एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यप (जो एलपीजी सिलेंडर डिस्ट्रीब्युटर आहे) आणि मित्र संदीप कुमार (एसएससी परीक्षेची तयारी करत असलेला) या दोघांच्या मदतीने रामकेशची हत्या केल्याचे अमृताने पोलिसांना सांगितले. अमृताचे रामकेशच्या मोबाईलमध्ये खासगी व्हिडीओ आणि फोटो होते. ते डिलीट करण्यास रामकेशने नकार दिला होता आणि त्यानंतर तिने हत्याचे कट रचला.