रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:30 IST2025-08-20T10:30:19+5:302025-08-20T10:30:53+5:30

...यानंतर, पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पिता खचला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला!

up firozabad girl was in objectionable situation with her boyfriend in a field at night father followed her and killed her | रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील जसराना भागात एका मुलीची तिच्याच वडिलांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. घरी झोपलेली मुलगी रात्री अचानक उठून बाहेर गेली. तिच्या मागे-मागे गेलेल्या वडिलांनी तिला एका शेतात तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितले. यानंतर संतापलेल्या वडिलांनी तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. यानंतर तो घरी परतला. जेव्हा गावकऱ्यांनी मुलीच्या मृतदेहाची माहिती दिली, तेव्हा तो घटनास्थळी पोहोचला आणि धायमोकलून रडू लागला. यानंतर, पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पिता खचला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

जसरानामधील नागला जाट येथील रहिवासी इंद्रपाल सिंह एक शेतकरी आहे. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वात लहान मुलगी नेहा बघेल (१८) तिच्या आई आणि बहिणीसह घराच्या व्हरांड्यात झोपली होती. ती रात्री उठून बाहेर गेली. वडिलांना जाग आली आणि आपली मुलगी प्रियकराला भेटण्यासाठी गेली असावी, असा संशय त्याला आला. यानंतर, तो कुऱ्हाड घेऊन मुलीला शोधण्यासाठी घराबाहेर पडले. 

यानंतर, त्याने आपल्यामुलीला जेव्हा तिच्या प्रियकरासोबत एका शेतात आक्षेपार्ह अवस्थेत बघितले, तेव्हा तो प्रचंड संतापला. त्याने तेथेच मुलीवर ओरडायला सुरुवात केली. दरम्यान, प्रियकर तेथून पळून गेला. यानंतर, रागाच्या भरात वडिलांनी मुलीवर कुऱ्हाडीने वार केला आणि तिला संपवले. 

यानंतर तो शांतपणे घरी परतला आणि सामान्यपणेच वागू लागला. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांनी त्याला मुलीच्या हत्येची माहिती दिली. यानंतर तो घटनास्थळी पोहोचला आणि धायमोकलून रडू लागला. पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन पथके तैनात केली. काही तासांतच पुराव्याच्या आधारे वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. यात त्याने मुलीच्या हत्येचे सत्य सांगितले.

Web Title: up firozabad girl was in objectionable situation with her boyfriend in a field at night father followed her and killed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.