Cow Smugglers News: गोशाळेवर गोतस्करांचा हल्ला; 32 गाईंची निर्दयीपणे केली कत्तल, दृष्य पाहून ग्रामस्थ संतापले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 18:52 IST2023-05-03T18:52:07+5:302023-05-03T18:52:47+5:30
Cow Smugglers News: घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Cow Smugglers News: गोशाळेवर गोतस्करांचा हल्ला; 32 गाईंची निर्दयीपणे केली कत्तल, दृष्य पाहून ग्रामस्थ संतापले...
Cow Smugglers News:उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. यादरम्यान एटा जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. जिल्ह्यातील पावस गावाजवळील लखमीपूर गोशाळेत घुसून गाय तस्करांनी अनेक गाईंची कत्तल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 30-32 गाईंना मारल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गोठ्याचे कुलूप तोडून गाईंना बाहेर नेले आणि निर्दयीपणे त्यांना धारदार शस्त्राने कापले. यानंतर त्यांचे अवशेष जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात टाकण्यात आले. यावेळी आरोपींनी गोशाळेत असलेल्या दोघआंना बेदम मारहाणदेखील केली. तीन जखमींपैकी 2 जणांना आग्रा येथे रेफर करण्यात आले असून एकावर एटामध्येच उपचार सुरू आहेत.
7 ते 8 आरोपी
या घटनेची माहिती स्थानिकांना समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोशाळेत पोहोचले. यावेळी गायी तस्करांच्या चपला, गाय कापण्याची हत्यारे, वाहणारे रक्त आणि गायींचे ताजे अवशेष आढळले. हे पाहून ग्रामस्थ संतप्त झाले. ही बाब उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली. सकाळी स्थानिक लोक शेतात गेले असता त्यांना एका तलावाजवळ गुरांची छाटलेली मुंडके व अवशेष पडलेले दिसले.
या घटनेनंतर बजरंग दल आणि गौ रक्षा समितीच्या सदस्यांनी गाय तस्करांना अटक करण्याची मागणी केली. माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी अंकित कुमार अग्रवाल आणि एएसपी धनंजय सिंह कुशवाह मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. याशिवाय पशुसंवर्धन विभागाचे पथक आणि श्वान पथक फॉरेन्सिक पथकही तेथे उपस्थित होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.